For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News | सातजणांची सव्वा पाच लाखांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

01:20 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
crime news   सातजणांची सव्वा पाच लाखांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा
Advertisement
इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी लावण्याचे दाखवले आमिष
सोलापूर : इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शहरातील सात तरुणांची सव्वा पाच लाखांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Advertisement

याबाबत उषांत कपिल जाधव (रा. न्यु बुधवार पेठ, आंबेडकर नगर, सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप शिंवाळ उर्फ शर्मा (रा. बाळे, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप शिंवाळ उर्फ शर्मा हा स्वतः इन्कम टॅक्स ऑफीसमध्ये क्लार्क असल्याचे सांगून त्याची पत्नी केंद्रीय विद्यालयात नोकरी करीत असल्याचे सर्वांना सांगतो.
 
तसेच माझी ऑफीसमधीलवरच्या अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असून इन्कम टॅक्स ऑफीसमध्ये नोकरी लावतो म्हणून न्यु बुधवार पेठ येथे उषांत जाधव यास सांगितले. त्यामुळे उषांत जाधव यांच्यासह इतर सहाजणांकडून ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत संदीप शर्मा याने वेळोवेळी ५ लाख २५ हजार रुपये घेतले.
पैसे देऊनही नोकरी काही लागेना म्हणून सर्वांनी शर्मा याच्याकडे नोकरी किंवा पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी शर्मा यांनी पैसे न देता सर्वांची फसवणूक केली. म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सुतार तपास करीत आहेत.

 

 

Advertisement
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.