महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'गोडसाखर'चे माजी चेअरमन शहापूरकरांसह 21 जणांवर गुन्हा

12:31 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
Crime against 21 people including former chairman of 'Godsakhar' Shahapurkar
Advertisement

गडहिंग्लज : 

Advertisement

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) मधील 29 कोटी 71 लाख 80 हजार इतक्या रक्कमेचे अनियमितता आणि आर्थिक शासकीय मंजुरीशिवाय व्यवहार केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर (रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) यांच्यासह एकूण 21 व्यक्तीच्यावर विविध कलमाखाली गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisement

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संदर्भात गडहिंग्लज पोलीसात दाखल झालेल्या या फिर्यादीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 कारखान्याचे लेखापरिक्षण सुशांत फडणीस यांनी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तत्कालीन चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी सहकार विभागाने कारखाना संचालक मंडळाला 2 कोटी रूपये खरेदीची मर्यादा ठेवली आहे. असे 2 कोटी रूपयाच्या खर्चास साखर आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे आवश्यकता आहे. असे असताना तत्कालीन चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी शासकीय नियमाचे उल्लघंन करत अल्टोटेक इंजिनिरिंग बारामती यांना 16 कोटी 20 लाखाची खरेदी ऑर्डर दिली आहे. त्यांना मंजुरीविना 4 कोटी अॅडव्हास दिला गेला आहे. या रक्कमेतून काही मशिनिरी आल्या आहेत. तरीही त्यापैकी अॅडव्हास रक्कमेतील 2 कोटी 38 लाख 76 हजार वसूल होत नाहीत. तत्कालीन कार्यकारी संचालक डिस्टलरी इनचार्ज, लेखापाल यांच्या संगमताने हा अपहार झाल्याचे म्हटले आहे. जुने गेअर बॉक्स रंगरंगोटी करून नवीन गेअर बॉक्स दर्शवून 2 कोटी 24 लाख 23 हजार इतकी रक्कम अपहार झाला आहे.

बॉयलर अत्याधुनिकरण करण्यासाठी मिरज येथील दोन कंपन्यांना मिळून 4 कोटी 46 लाख 13 हजार इतकी रक्कम अॅडव्हास दिली आहे. यामध्ये शासकीय आदेशाचे उल्लंघन झाले आहे. बॉयलर अत्याधुनिकरणाचे आदेश देवून सदरचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. असा ठपका ठेवला आहे. टर्बाइन खरेदी व दुरूस्ती यातही 1 कोटी 35 लाख 31 हजाराचा अपहार झाला आहे. तोडणी व वाहतूक अॅडव्हासमध्ये 98 लाख 21 हजार इतकी रक्कम 14 ठेकेदारांना दिली आहे. त्यापैकी एकही ठेकेदार हजर नाही. अथवा काम केले नाही. त्यामुळे या रक्कमेचा अपहार झाला आहे. एकूण 29 कोटी 71 लाख 80 हजार इतक्या रक्कमेचा या प्रकरणी माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह तत्कालीन कार्यकारी संचालक औंदूबर तांबे (रा. धायरी पूणे), सुधीर पाटील (रा. येडेनिपाणी ता. वाळवा), महावीर घोडके (रा. हाळचिंचोली, ता. आक्कलकोट), कारखान्याचे सचिव मानसिंग देसाई (रा. कडगाव), डिस्टलरी प्रमूख रणजित देसाई (रा. ऐनापूर), मुख्य कृषी अधिकारी लक्ष्मण देसाई (लिंगनूर तर्फ नेसरी), मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर (रा. गडहिंग्लज), उस तोडणी वाहतूक ठेकेदार श्रीमंत पूजारी (रा. नंदनवाड), राजेंद्र देसाई (इंचनाळ), संतोष पाटील (रा. भादवण), अनिल भोसले (रा. इंचनाळ), शिवाजी शिंत्रे (रा. बेळगुंदी), सयाजी देसाई (रा. इंचनाळ), बसवराज आरबोळे (रा. तनवडी), रूपाली किरण पाटील, महेश ताडे, विलास ताडे यल्लुप्पा बोकडे, हनमंत तेंडे, दादासाहेब तोंडे (सर्वांचा पत्ता नोंद नाही) या 21 जणांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे करीत आहेत.

फिर्यांदीतून 18 संचालकांना वगळले

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणूकीत आमदार मुश्रीफ आणि डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल सत्तेत आल्यानंतर डॉ. शहापूरकर यांना एकहाती कारभार करण्यासाठी चेअरमन म्हणून निवडण्यात आले होते. या निवडीनंतर काही दिवसात कारखान्याच्या विद्यमान संचालकांनी त्यांच्या कारभाराबाबत आक्षेप घेत साखर आयुक्त आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे 14 ऑक्टोबर रोजी सक्षम भेटून बेकायदेशीर कारभाराच्या चौकशीची मागणी केली होती. सहकार कायदा 73 अन्वये आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांना यात जबाबदार धरण्यात येत नाही. म्हणून व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह अन्य 18 संचालकांना यातून वगळण्यात आल्याचे फिर्यांदीत म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article