महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस अधिकाऱ्यासह 14 जणांवर गुन्हा

11:59 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांचा समावेश : ऐगळी पोलीस स्थानकात एफआयआर, घटनेने खळबळ

Advertisement

बेळगाव : सार्वजनिक विहिरीचे पाणी घर बांधण्यासाठी वापरत असल्याच्या कारणावरून  दांपत्यासह मुलाला मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षकासह 14 जणांवर ऐगळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने चर्चेला उधाण आले आहे. नकुशा सैदाप्पा गडादी यांनी ऐगळी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक रविंद्र गडादी यांच्यासह महांतेश कांबळे, संतोष गडादे, अशोक गडादे, संदीप कांबळे, तिप्पान्ना गडादे, राजू गडादे, विजय गडादे, कुमार कांबळे, आदित्य गडादे, कुमार शिंगी, सुरेश कांबळे, परशुराम गडादे, सुभाष गडादे, (सर्व रा. ऐगळी, ता. अथणी) यांच्यावर ऐगळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीदारांकडून ऐगळी गावामध्ये नवीन घर बांधले जात आहे. यासाठी त्यांनी घरासमोर असलेल्या सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरत होते. दरम्यान, उपरोक्तांकडून पूर्ववैमनस्यातून विहिरीभोवती शेडनेट उभारून पाणी वापरण्यास मज्जाव केला होता. यावरून फिर्यादीदार नकुशा सैदाप्पा गडादे यांनी ग्राम पंचायतीकडे रितसर अर्ज करून पाणी वापरण्यासाठी परवानगी मागून उभारण्यात आलेले शेडनेट काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम पंचायतीकडून सदर शेडनेट काढून पाणी वापरण्यास सोय करून दिली होती. आपल्या विरोधात जावून पाणी वापरत असल्याच्या कारणावरून उपरोक्तांनी फिर्याददारांवर दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नकुशा यांचा विनयभंग करून पती व मुलाला जबर मारहाण केली. तितकेच नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर ऐगळी पोलिसांनी भा.दं.वि. 109, 143, 147, 307, 323, 324(बी), 504, 506 सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article