For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने घेतले दत्त महाराजांचे दर्शन

09:50 PM May 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने घेतले दत्त महाराजांचे दर्शन
Advertisement

नृसिंहवाडी/ प्रतिनिधी

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे पुत्र भारतीय क्रिकेट संघाचे डावखुरे गोलंदाज अर्जुन तेंडुलकर यांचे आज सकाळी सव्वा अकरा च्या दरम्यान दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे आगमन झाले. क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर येणार याची फारशी कुणाला कल्पना नव्हती येथील पत्रकारांना मात्र थोडी कुणकुण लागली होती. येथील दत्त देवस्थानच्या अन्नछत्रा पासून सुरक्षारक्षका सह मंदिर परिसरात प्रवेश केला कोण आहे कोण आला हे समजताच येथील दत्त भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली.

Advertisement

या चहात्यांच्या गर्दीच्या गराड्यातच त्याचे थेट मंदिरात आगमन झाले त्याने नतमस्तक होऊन श्री चरणाचे दर्शन घेतले यानंतर दत्त देवस्थान चे अध्यक्ष वैभव पुजारी यांनी प्रार्थना करुन श्री चरण कमलांचा फोटो नारळ प्रसाद महावस्त्र देऊन स्वागत केले. काही दिवसांपूर्वी पहाटे सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर यांनी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनाचाना साठी आले होते पहाटे ची वेळ असल्यामुळे आल्यामुळे ते येऊन गेले व सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे हे येऊन फारसे कोणाला समजले नाही समझले पण आज दिवसा अर्जुन तेंडुलकर यांनी दर्शनासाठी आल्या मुळे याची झलक येथे पहावयास मिळली

Advertisement
Advertisement
Tags :

.