टांझानियामध्ये जय शहा यांच्या हस्ते क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
टांझानिया देशातील आयसीसी मान्यताप्राप्त पहिलेच क्रिकेट स्टेडियम असून, संपूर्ण आफ्रिका खंडात क्रिकेटच्या विकासाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल क्रिकेट टांझानियाचे अभिनंदन करताना, शहा यांनी देशात जागतिक दर्जाची क्रिकेट सुविधा उभारण्यासाठी घेण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली. यावेळी सोशल मीडियावर पोस्ट करत जय शहा म्हणाले की टांझानिया क्रिकेट एरिनाच्या उद्घाटनाबद्दल टांझानियाचे अभिनंदन. व टांझानिया आणि संपूर्ण आफ्रिकेतील क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. देशातील आयसीसी मान्यताप्राप्त पहिल्या क्रिकेट स्टेडियमच्या या उत्कृष्ट नवीन सुविधेचे अधिकृत उद्घाटन करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती, हे स्टेडियम म्हणजे टांझानिया खेळाचा विस्तार करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या दूददृष्टी, समर्पण आणि कठोर परिश्रमांचे प्रतीक आहे, असे शहा म्हणाले.
