For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक, निना संघ विजयी

10:00 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक  निना संघ विजयी
Advertisement

केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकेंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड संघाने आनंद क्रिकेट अकादमी बी चा तर निना स्पोर्ट्सने तानाजी स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. यासीस कुरबर, अंगदराज हितलमनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगावच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात निना स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडीबाद 337 धावा केल्या. त्यात अंगदराज हित्तलमनीने 4 षटकार व 20 चौकारासह 171 धावा करून झुंजार शतक झळकविले. सोहब मण्णुरवालेने 7 चौकारासह 89, माजीद मकानदारने 1 षटकार, 5 चौकारासह 49 धावा केल्या. तानाजी स्पोर्ट्सतर्फे ताहिरने 2, तर शिवशंकर व शिवाने 1 गडीबाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्स संघाचा डाव 43.3 षटकात 235 धावात आटोपला. त्यात बसवराज के ने 11 चौकारांसह 61, सचिन रायकरने 51, अश्पाकने 49 धावा केल्या. निनातर्फे इस्माईल सय्यदने 49 धावात 5 तर अबररा काद्रीने 2 गडीबाद केल्या. दुसऱ्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका संघाने प्रथम फलंदाजी करताना 41.3 षटकात सर्वगडी बाद 136 धावा केल्या. त्यात यासीस कुरबरने 29, सचिन रजपूत व समर्थकुमार यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे केतज कोल्हापूरेने 49 धावात 5 तर अद्वैत साठेने 12 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीचा डाव 48.3 षटकात 129 धावात आटोपला. केतज कोल्हापूरने 3 चौकारांसह 25, लाभ वेर्णेकरने 22 धावा केल्या. क्रिकेट क्लबतर्फे यासीस कुरबरने 32 धावात 4 तर तेजस मुर्डेश्वर व आदित्य शिवभोगी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.