आनंदव्हाळ येथे कर्नाटक येथील क्रेटा कारचा अपघात
11:16 AM Jan 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
चौके/वार्ताहर
Advertisement
मालवणहून कुडाळच्या दिशेने जाणारी कर्नाटक येथील पर्यटकांची क्रेटा कार (KA22MD4381) आनंदव्हाळ येथील मराठी शाळेनजीक रस्त्याच्या बाजूच्या संरक्षक भिंतीला धडकल्याने अपघात झाला . हा अपघात गुरुवार दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजण्याच्या सुमारास घडला . या कारमधून चार पर्यटक प्रवास करीत होते.एवढा मोठा अपघात घडूनही कोणीही जखमी झालेले नाही.ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. अतिवेगात असल्यामुळे गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे आजगांवकर यांच्या बागेच्या दगडी गडग्याला कार जाऊन धडकली. परंतु जवळ जवळ १०० फुट गडगा उडवित कार जावून एका झाडाला अडकल्याने मोठा अपघात टळला.जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यासाठी उशिरा पर्यत प्रयत्न चालू होते.
Advertisement
Advertisement