For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या तिमाहीत क्रेडिट कार्ड वितरणात घट

06:36 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या तिमाहीत क्रेडिट कार्ड वितरणात घट
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

क्रेडिट कार्ड वितरणाच्या संख्येमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये घसरण झालेली पहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत एकंदर 4.4 दशलक्ष क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. सदरची माहिती जेएम फायनाशियल इन्स्टिट्यूशनल सेक्युरीटीज यांनी दिली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीमध्ये क्रेडिट कार्डचा वितरणाचा विकास काहीसा दबला गेला होता. 4.4 दशलक्ष इतकी क्रेडिट कार्ड वितरीत करण्यात आली असून हे प्रमाण वर्षाच्या आधारावर पाहता 28 टक्क्यांनी कमी राहिले आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 6.1 दशलक्ष क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले होते.

Advertisement

आर्थिक वर्ष 2025 मध्ये क्रेडिट कार्डचे वितरण विक्रमी स्तरावर होते. त्या तुलनेमध्ये यंदा प्रमाण 20 टक्के घसरले आहे. खासगी बँका यांनी आपली क्रेडिट कार्डसंदर्भातील बाजारातील पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 78 टक्के इतकी जी क्रेडिट कार्ड वितरीत करण्यात आली आहेत ती खासगी क्षेत्रातील संस्थांकडून केली गेली आहेत. यानंतर बिगर बँकिंग क्षेत्राच्या वित्त संस्था व इतर संस्थांनी क्रेडिट कार्डचे वितरण केले आहे. आरबीआयच्या अहवालानुसार एसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक यांनी क्रेडिट कार्ड वितरणास आघाडी घेतली आहे. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, आरबीएल आणि इंडस इंड बँक यांच्या क्रेडिट कार्ड वितरणात घट झाली आहे.

Advertisement
Tags :

.