For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रेडाई बेल्कॉन-ऑटो एक्स्पोचा थाटात शुभारंभ

10:56 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रेडाई बेल्कॉन ऑटो एक्स्पोचा थाटात शुभारंभ
Advertisement

बेळगावकरांसाठी उत्तम संधी : लाभ घेण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्कॉन-ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन गुऊवारी सायंकाळी  सीपीएड मैदानावर करण्यात आले. कर्नाटक व्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या हस्ते प्रवेशद्वारावरील बेल वाजवून प्रदर्शनाला चालना देण्यात आली. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर आणि इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. क्रेडाईच्या महिला विंगच्यावतीने सुवासिनींनी आरती ओवाळून प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत केले. सदर प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत असून यामध्ये 220 स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे.

बेल्कॉन प्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडिया, विक्रम टीएमटी, युनियन बँक, बालाजी रेडीमिक्स काँक्रीट, एस. जे. इंडस्ट्रीज, तिऊपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित केले आहे. तर ऑटो एक्स्पो प्रदर्शन सुंदरम मोटर्स, वर्षा ऑटोमोबाईल्स, ऑडी, बी. वाय. डी., पॅनरा बँक, फोल्क्स वॅगन आणि वेगा यांनी प्रायोजित केले आहे. या प्रदर्शनात बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंबरोबरच बेळगाव येथील बहुतेक सर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सहभागी झाले आहेत. घर बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली मांडण्यात आल्या असून बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत टाईल्स, पेंट्स, नळ, सिमेंट, सोलार, फर्निचर, गृहशोभेच्या वस्तु आदी स्टॉल मांडण्यात आले आहेत. बेल्कॉनच्या शामियान्याला लागूनच उभारण्यात आलेल्या दुसऱ्या भव्य मंडपात ऑटो एक्स्पोची मांडणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रीक दुचाकी, तिचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे. काही जगप्रसिद्ध वाहने येथे मांडण्यात आली असून ती पाहण्याची दुर्मीळ संधी बेळगावकरांना लाभली आहे. उद्घाटनानंतर पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Advertisement

दरम्यान, ढोल-ताशा यांच्या निनादात स्वागत करून फेटे बांधून पाहुण्यांना प्रदर्शनस्थळी आणण्यात आले. तत्पूर्वी क्रेडाईच्या कार्यालयाचे फीत सोडून पाहुण्यांनी उद्घाटन केले. अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन बेळगाव क्रेडाईने आयोजित केल्याबद्दल दोन्ही पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रदर्शन भरविण्यासाठी व्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेव्रेटरी युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोळकर यांच्यासह राजेश माळी, सचिन बैलवाड, अभिषेक मुतगेकर, आनंद तुडवेकर, ज्ञानेश सायनेकर, सुनील पुजारी, यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम परिश्र्रम घेत आहेत. याप्रसंगी सागर कल्लेहोळकर, अमर अकणोजी, मदन देशपांडे, राहुल बांडगी, माजी अध्यक्ष राजेश हेडा, सुधीर पानारे, चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतकेकर, गोविंद टक्केकर, किल्लेकर, परशराम नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महिला विंगच्या दीपा वांडकर, कऊणा हिरेमठ, अपर्णा गोजगेकर, सीमा हुलजी, अपर्णा कल्लेहोळकर, अश्विनी बांडगी, अमृता अकणोजी, सविता सायनेकर, सायली अकणोजी, भारती हिरेमठ, देवकी माळी, राजश्री मुतकेकर, चिन्मयी बैलवाड, अनुश्री बैलूर, लक्ष्मी पाटील, क्रांती खाडे, अनंत पाटील, सुभाष देसाई, श्रीकांत ओऊळकर, गजानन फगरे, आरीफ नाईक आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी आज स्पर्धा

क्रेडाईच्यावतीने बेल्कॉन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिव्हिल डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी फसाद मॉडेल मेकिंग व सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 23 रोजी या स्पर्धा सीपीएड मैदानावर घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रदर्शन बेळगावात पहिल्यांदाच...

बेळगावमध्ये क्रेडाईतर्फे अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन पहिल्यांदाच  भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात घर बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तु एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोठमोठ्या महानगरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तु या दालनात मांडण्यात आल्या आहेत. खरोखरच अत्युत्तम असे हे प्रदर्शन आहे. याचा लाभ बेळगावकरांनी घ्यावा.

- प्रदीप रायकर, अध्यक्ष, कर्नाटक क्रेडाई

Advertisement
Tags :

.