महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

101 क्विंटल धान्यापासून राम-सीतेच्या चित्राची निर्मिती

06:47 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नेपाळच्या जनकपुरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतीमुळे त्यांचे जगभरात कौतुक होत आहे. नेपाळमध्ये भगवान राम आणि सीतेची एक कलाकृती तयार करण्यात आली असून ती विश्वविक्रम नोंदविणारी ठरली आहे. ही काही साधारण कलाकृती असून ती अत्यंत अनोख्या शैलीत तयार करण्यात आली आहे.

Advertisement

ही कलाकृती तयार करण्यासाठी 11 प्रकारच्या 101 क्विंटल धान्याचा वापर करण्यात आला आहे. 120 फूट लांब आणि 91.5 फूट रुंद कलाकृतीला अत्यंत सुंदरपणे तयार करण्यात आले आहे. ही कलाकृती 10,800 चौरस फुट क्षेत्राला व्यापणारी आहे. नेपाळच्या दोन तर भारतातील 8 कलाकारांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे. विशेष म्हणजे या कलाकृतीसाठी कुठल्याही प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आलेला नाही.  या कलाकृतीत राम, सीतामातेसोबत महर्षी विश्वामित्र तसेच राजा जनकही दिसून येतात. मागील वर्षी अशीच कलाकृती अयोध्येत तयार करण्यात आली होती. ही कलाकृती तयार करण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागला असून आता ती सर्वसामान्यांना पाहता येणार आहे.

Advertisement

भगवान राम आणि सीतामातेची ही कलाकृती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या कलाकृतीला विवाह पंचमीनिमित्त साकारण्यात आले आहे. विवाह पंचमीला राम आणि सीतामातेच्या विवाहाचा शुभदिन म्हणून साजरे करण्यात येते. मागील 5 हजार वर्षांपासून विवाहपंचमी साजरी करण्यात येत आहे. विवाह पंचमीच्या दिनी वरपक्षाचे अतिथी होत लोक मंदिरात पोहोचतात. मूर्तींची शहरात पालखी मिरवणूक काढली जाते. या कलाकृतीमुळे आता पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आता अधिकाऱ्यांना वाटत आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article