For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सिगारेटच्या तुकड्यांनी मजबूत रस्त्याची निर्मिती

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिगारेटच्या तुकड्यांनी मजबूत रस्त्याची निर्मिती
Advertisement

सिगारेट ओढल्यावर अनेकदा लोक त्याचे तुकडे रस्ते, फुटपाथांवर फेकून देतात. या तुकड्यांमधील प्लास्टिक फिल्टर अनेक वर्षांपर्यंत कायम राहू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सिगारेटच्या या कचऱ्याला दूर करण्यासाठी एक अनोखी पद्धत विकसित केली आहे. मेलबर्नच्या आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या इंजिनियर्सनी सिगारेटच्या तुकड्यांच्या काचऱ्याचा वापर रस्तेनिर्मितीसाठी करत पर्यावरण रक्षणासाठी मोठा मार्ग दाखविला आहे. संशोधकांनी सिगारेटच्या तुकड्यांना डांबरात मिसळण्याचे असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे त्यांना रस्ते निर्माण करणाऱ्या सामग्रीत बदलू शकते. यात सिगारेटच्या तुकड्यांना डांबरात मिसळण्यापूर्वी बिटुमेन किंवा पॅराफिन वॅक्सने कव्हर करण्यात आले. फिल्टरमधील केमिकल बाहेर पडू नये यासाठी ही कृती करण्यात आली.  योग्य प्रमाणात कव्हर करण्यात आलेल्या सिगारेटच्या तुकड्यांनी युक्त डांबर मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यांची आवश्यकता पूर्ण करू शकते असे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परीक्षणांमधून कळले आहे. तसेच याची थर्मल कंडक्टिव्हिटी पारंपरिक डांबराच्या तुलनेत कमी असते.

Advertisement

सहजपणे होत नाही नष्ट

सिगारेटचे तुकडे सेल्यूलोज एसिटेटने निर्माण केलेले असतात, जे एक प्रकारचे प्लास्टिक आहे. हे सहजपणे नष्ट होत नाही.  याचबरोबर फिल्टरमध्ये निकोटीन, धातूंसोबत तंबाखू आणि सिगारेटच्या धुरापासून वाचलेले रासायनिक अवशेषही असू शकतात. डांबरात सिगारेटचे तुकडे मिसळण्यापूर्वी सिगारेटच्या तुकड्यांना सील करण्याच्या पद्धतीचे परीक्षण करण्यात आले. संशोधकांनी फिल्टरवर बिटुमेन किंवा पॅराफिन वॅक्सचे कोटिंग करण्यात आले. यामुळे फिल्टरवर असे आच्छादन तयार झाले, जे पाणी किंवा इतर द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्यावर या पदार्थांना बाहेर पडण्यापासून रोखते.

Advertisement

उष्णता वाढण्यापासून रोखणार

कव्हर करण्यात आलेल्या तुकड्यांनी डांबराचे घनत्व कमी केले आणि याच्या पोरॉसिटीला वाढविल्याचे अध्ययनाच्या निष्कर्षांमधून स्पष्ट झाले. या बदलांमुळे याची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कमी करण्यास मदत मिळाली. यामुळे उष्णतेच्या समस्येवर सामोरे जाण्यास मदत मिळू शकते. कारण सामान्य डांबर मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेत ती राखू शकते. यामुळे तापमान वाढत असते.

Advertisement
Tags :

.