For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केसाच्या आकाराइतकी बॅटरीची निर्मिती

06:24 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
केसाच्या आकाराइतकी बॅटरीची निर्मिती
Advertisement

वैज्ञानिकांना मिळाले मोठे यश

Advertisement

तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आणि आकाराची बॅटरी पाहिली असेल. परंतु अलिकडेच अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी  केसाच्या आकाराची बॅटरी विकसित केली आहे. ही बॅटरी इतक्या कमी आकाराच्या रोबोटला शक्ती देण्याचे काम करू शकते. ही एक झिंक-एअर बॅटरी असून ती स्वत:च्या आसपासच्या ऑक्सिजनचा खेचून झिंकच्या छोट्या प्रमाणाला ऑक्सिकृत करते. या प्रक्रियेतून 1 व्होल्टपर्यंत पॉवर पुरवठा निर्माण होऊ शकतो. ही बॅटरी ऊर्जा सेंसर किंवा एक छोटी रोबोटिक भूजा सारख्या गोष्टींना ऊर्जा पुरवू शकते. मधुमेहाने पीडित व्यक्तींच्या पेशींमध्ये थेट इन्सुलिन सारख्या पदार्थांना पोहोचविण्यास या छोट्या रोबोटिक भूजा मदत करू शकतात.

वैज्ञानिक दीर्घकाळासाठी या पेशीच्या आकाराचा रोबोट ‘मॅरियोनेट्स’ला शरीरात विशिष्ट स्थानांवर औषधे पोहोचविण्यासाठी तयार करत आहेत. परंतु यासाठी रा रोबोट्सना दीर्घकाळासाठी शक्ती प्रदान करणे आव्हान ठरत आहे. याकरता अनेक वर्तमान डिझाइन सौरऊर्जेचा वापर करत आहेत. म्हणजेच एक तर सूर्याच्या प्रकाशात जावे लागेल किंवा लेझरद्वारे त्यांना नियंत्रित केले जाऊ शकते. परंतु दोघांपैकी कुठलेही शरीरात अत्यंत आत जाऊन काम करू शकत नाही. अशा स्थितीत रोबोटच्या बॅटरीला रिचार्ज करणे देखील एक आव्हान आहे. तर वैज्ञानिकांनी या नव्या शोधाद्वारे हे काम सोपे केले आहे.

Advertisement

या संशोधनाशी निगडित अध्ययनाचे वरिष्ठ लेखक आणि एमआयटीचे केमिकल इंजिनियर मायकल स्ट्रानो यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मॅरियोनेट सिस्टीमला प्रत्यक्षात बॅटरीची गरज नाही, कारण त्याला स्वत:च्या गरजेची सर्व ऊर्जा बाहेरूनच मिळत आहे. हा छोटा रोबोट अशा ठिकाणी देखील पोहोचावा, जेथे आम्ही पोहोचू  शकत नाही असे वाटत असेल तर त्याला अधिक स्वायत्ततेची गरज असेल असे त्यांनी सांगितले.

ही बॅटरी आतापर्यंतच्या सर्वात छोट्या बॅटऱ्यांपैकी एक आहे. यापूर्वी जर्मनीच्या संशोधकांनी 2022 मध्ये एक मिलिमीटर आकाराच्या बॅटरीची निर्मिती केली होती. जी एका मायक्रोपिचवर फिट व्हायची. तर स्ट्रानो आणि त्यांच्या टीमने निर्माण केलेली बॅटरी त्यापेक्षा 10 पट कमी आकाराची आहे. ही केवळ 0.1 मिलिमीटर लांब आणि 0.002 मिलिमीटर रुंदीची आहे. म्हणजेच एक सरासरी मानवी केसाशी तुलना केली तर तेही सुमारे 0.1 मिलिमीटर रुंदीचे असतात.

या बॅटरीत दोन मुख्य घटक असून एक झिंक इलेक्ट्रोड तर दुसरा प्लॅटिनम इलेक्ट्रोड असून तो एसयू-8 नावाच्या पॉलिमरमध्ये एम्बेडेड असतो. झिंक आणि ऑक्सिजनसोबत प्रतिक्रिया झाल्यावर एक ऑक्सिकरण प्रतिक्रिया निर्माण होते, जी इलेक्ट्रॉन्सना सोडण्याचे काम करते. यात इलेक्ट्रॉन प्लॅटिनम इलेक्ट्रॉडमध्ये प्रवाहित होतात.

Advertisement
Tags :

.