मतदारयादी फेरपडताळणीसाठी नागरिकांमध्ये जागृती करा
राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद : जि. पं. सभागृहात बैठक
बेळगाव : निवडणुकीदरम्यान विशेष मतदार यादी फेरपडताळणी आणि स्वीप (पद्धतशीर मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग) उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच स्वीप उपक्रमाद्वारे मतदार यादी फेरपडताळणीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याची सूचना राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी दिली. सोमवारी जि. पं. सभागृहात विशेष व्यापक सुधारणा तयारी, एसआयआर/एसएसआर, स्वीप/ईएलसी संबंधित उपक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची तयारी याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
वस्त्रद म्हणाले, अधिकाऱ्यांनी बॅनर, पत्रके व जनजागृती आदी उपक्रमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीप कार्यक्रमांचे आयोजन करावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना विशेष मतदार यादीच्या फेरपडताळणीबाबत माहिती मिळणे सोपे होणार आहे. विशेष मतदार यादी फेरपडताळणी म्हणजे काय?, मतदार यादीची फेरपडताळणी का आवश्यक आहे?, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील स्वीप व ईएलसीअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांची माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जि. पं. योजना संचालक रवी बंगारप्पनवर, मनपा उपायुक्त रेश्मा तालिकोटी, उदयकुमार बी. टी., डीडीपीयू एम. एम. कांबळे, जिल्हा पीयू नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, डीएचओ डॉ. आय. पी. गडाद यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.