28 फेब्रुवारीला झळकणार ‘क्रेझी’
अभिनेता सोहम शाहने स्वत:चा आगामी चित्रपट ‘क्रेझी’ची घोषणा केली आहे. हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल. तुम्बाड आणि क्रेझी दरम्यान हा क्रॉसओव्हर चित्रपटातील थरारकतेची झलक दर्शवितो, याचा टीझर जारी करण्यात आला असून तो अत्यंत दमदार आहे. सोहमने या चित्रपटचे पोस्टर शेअर केले आहे.
क्रेझी हा चित्रपट एका पित्याची कहाणी व्यक्त करतो, जो स्वत:च्या जीवनातील सर्वात वाईट दिवशी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट केवळ थ्रिलर नसून यात भावनांचे प्रभावी चित्रण आहे. क्रेझी या चित्रपटात किशोर कुमार यांचे गाणे ‘अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू’चे रिमार्स्टड वर्जन वापरण्यात आले आहे. हे गाणे यापूर्वी अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘इंकलाब’मध्ये वापरण्यात आले होते. क्रेझी हा चित्रपट बॉलिवूडच्या थ्रिलर जॉनरमध्ये एक नवा मापदंड निश्चित करणारा चित्रपट ठरणार असल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाची कहाणी गिरीश कोहली यांनी लिहिली असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. तर सोहम शाह, मुकेश शाह, अमिता शाह आणि आदेश प्रसाद यांनी याची निर्मिती केली आहे.