देशमुख रोड कॉर्नरवर कोल्ड डांबरद्वारे चर बुजविली
बेळगाव : आरपीडी सर्कल येथे देशमुख रोड कॉर्नरवर निर्माण झालेल्या धोकादायक चरीवर ‘कोल्ड डांबर’ घालण्यात आला असल्याने तेथील समस्या मार्गी लागली आहे. गेल्या काही दिवसापासून त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना विशेष करून महिला व वृद्धांना धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून धोकादायक चरीवर मंगळवारी डांबर घालण्यास सांगितल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या काही दिवसापूर्वी देशमुख रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. जॉईंटच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काँक्रीट घालण्यास न आल्याने सदर चर धोकादायक बनली होती. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिला व वयोवृद्धांना आपली दुचाकी वाहने सावरणे कठीण झाले होते. त्यामुळे ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. नगरसेवक नितीन जाधव यांनी यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा करून सदर चरीवर कोल्ड डांबर घालण्यास सांगितल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कोल्ड डांबर पावसाळ्यातदेखील उखडत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच हा प्रयोग राबविण्यात आला आहे.