For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवैध उत्खनन करणाऱ्यांना दणका

11:40 AM May 26, 2025 IST | Radhika Patil
अवैध उत्खनन करणाऱ्यांना दणका
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत :

Advertisement

 जिल्ह्यात गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हा खणकर्म विभागाकडून कारवाई केली जात आहे. वर्षभरात या विभागाने अनधिकृत उत्खनन करणाऱ्या 65 जणांवर कारवाई केली असून एकावर गुन्हाही दाखल केला आहे.

जिल्ह्यातील काही भागात अवैध उत्खननाचे प्रकार होत आहेत. यापूर्वी राधानगरी, करवीर परिसरातील डोंगरामध्ये विनापरवाना बॅक्साईटची तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. यासह माती, वाळू, दगड, चिरा, सिलीका यांचेही अवैध उत्खन होत असून यावरही जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे अवैध गौण खनिजाची वाहतुक करताना अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Advertisement

कोल्हापूर जिह्याच्या पश्चिम भागामध्ये बॉक्साईट खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. पूर्वी जिह्यामध्ये 19 बॉक्साईट खाणी होत्या. मात्र, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, न्यायालयीन निवाडे यामुळे त्या बंद केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात काही खाणी अधिकृतपणे सुरू आहेत. मात्र, काही टोळ्या जिह्याच्या विविध भागांत अनधिकृतपणे उत्खनन करतात. अशावर जिल्हा प्रशासन अचानक धाड टाकून कारवाई करते. वर्षभरात अशा प्रकारे 65 अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली असून यामध्ये 24 मुरूम आणि 23 मातीचे अवैध उत्खनन झाले आहे. संबंधितांना 57 कोटींचा दंड केला आहे. त्यांच्याकडून 39 लाखांच्या दंडाची रक्कम वसुलीही केली आहे.

  • 'अॅल्युमिना' साठी बॉक्साईट महत्वाचे  

ज्या बॉक्साईटमध्ये अॅल्युमिना 45 टक्क्यांपेक्षा अधिक असते ते सर्वोत्तम दर्जाचे असते. सिमेंट बनवण्यासाठी अॅल्युमिनाची आवश्यता असते. बॉक्साईटवर प्रक्रिया करून अॅल्युमिना वेगळा केला जातो.

  • अवैध उत्खनन, चोरटी वाहतूक

दगड वाहतुकीचा परवाना घेतला जातो; पण प्रत्यक्षात बॉक्साईटची वाहतूक केली जात असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. सिमेंट निर्मितीमध्ये वापरण्यासाठी बॉक्साईट चोरट्या मार्गाने नेले जाते. ही चोरटी वाहतूक आणि बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक

अवैध उत्खन्नसंदर्भात सर्व तालुक्यातील तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात काही माहिती मिळाल्यास त्यानुसार तालुकास्तरावरील पथकाकडून कारवाई होते. नागरिकांनीही अवैध उत्पन्न होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तहसील कार्यालयात माहिती द्यावी

                                                                                                                              आनंद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी

  • महसुल बुडविण्यासाठी खटाटोप

अवैध उत्खनन करणारया 65 जणांवर झालेल्या कारवाईत 1 कोटी 61 लाख 68 हजार 300 इतक महसूल जमा अपेक्षित होता. ही रक्कम वाचविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप होता.

  • अवैध उत्खनाचे परिणाम

अवैध उत्खननामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो, जसे की जमिनीची धूप, पाण्याचा पुरवठा कमी होणे आणि वन्यजीवांवर परिणाम होणे. शासनाचा महसूल कमी होतो. वादविवाद आणि गुन्हेगारी वाढते.

  • उत्खनावर कारवाई

अवैध उत्खनावर कारवाई -65

दंड-57 कोटी 25 लाख 14 हजार 64

दंड वसुल-39 लाख 71 हजार 895

  • वाहनांवर कारवाई

वाहनांवर कारवाई -12

दंड -58 लाख 74 हजार 411

दंड वसुल-24 लाख 32 हजार 136

                    उत्खनावर कारवाई                                   वाहनावर कारवाई

दगड                             9                                                      2

मुरूम                          24                                                        4

माती                               23                                                     4

वाळू                               4                                                       1

सिलीका                          5                                                           1

एकूण                                65                                                 12

Advertisement
Tags :

.