For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

kolhapur : सीपीआरची ओपीडी दोन दिवस राहणार बंद !

01:02 PM Oct 17, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   सीपीआरची ओपीडी दोन दिवस राहणार बंद
Advertisement

                    अपघात विभागासह अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

Advertisement

कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) बाह्यरुग्ण विभाग मंगळवार दि. २१ आणि गुरुवार दि. २३ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत अपघात विभाग आणि अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी दिली.

सीपीआरला २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत सोमवार दि. २० आणि बुधवार दि. २२ रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. मिरजे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.