कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

CPR Hospital: महिलेच्या मृत्यूनंतर CPR मध्ये नातेवाईकांचा गोंधळ, उपचारादरम्यान मृत्यू

03:32 PM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणवाचे वातावरण निर्माण झाले

Advertisement

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) अपघात विभागात दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणवाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

Advertisement

शहिदा जहॉंगीर नाकाडे (वय 60, रा. साळवण, ता. गगनबावडा) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. शवविच्छदेन झाल्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती अशी, मृत शहिदा नाकाडे यांचा दीड महिन्यापूर्वी अपघात झाला होता. एका मोटारसायकलने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर एका खासगी दवाखन्यात उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक बनल्याने मंगळवारी दुपारी त्यांना खासगी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना अपघात विभागातच त्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त बनले.

यानंतर नातेवाईकांनी वेळेवर उपचार होत नसतील तर काय उपयोग? हलगर्जीपणा होत असेल तर रुग्ण बरा कसा होणार? आदी प्रश्नांचा भडिमार करत संताप व्यक्त केला. डॉक्टर व नातेवाईक यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याचे लक्षात येताच सीपीआर पोलीस चौकीतील कर्मचारीही दाखल झाले. सीपीआरच्या सुरक्षा रक्षकांनी नातेवाईकांना बाजूला केले.

संबधिंत डॉक्टरांची चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव वाढत गेला. घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वाद निवळला. नातेवाईकांचा आरोप नाकाडे यांना नातेवाईकांना आयसीयू बेडची खातरजमा करून दुपारी सीपीआरमध्ये आणले.

अपघात विभाग फुल्ल असल्याने रूग्णाला काहीकाळ रूग्णवाहिकेतच ठेवावे लागले. काही वेळाने अपघात विभागात दाखल केल्यानंतरही रूग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनीच रूग्णाला ऑक्सिजन लावला. तरीही डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याला डॉक्टरांचा बेजबाबदरापणाच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला. उपचारा दरम्यान मृत्यू दाखल केलेल्या रूग्णाची स्थिती चिंताजनक होती. ऑक्सिजन लावून उपचार सुरू केले होते. आयसीयूमध्ये दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#cpr_hospital#crime news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article