Kolhapur CPR Hospital: CPR च्या पार्किंगचा प्रश्न सुटणार तरी कधी, वाहने लावायची कुठे?
गाड्या लावण्यास जागाच मिळत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांसोबत रोज वादावादीचे प्रसंग
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) नुतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पार्पिंगला जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनांना प्रवेश बंद केला आहे. उपचारासाठी येणारे रूग्ण आणि नातेवाईकांना सीपीआरमध्ये गाड्या लावण्यास जागाच मिळत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांसोबत रोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
त्यामुळे सीपीआरमधील पार्पिंगचा प्रश्न सुटणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधीच रूग्ण अॅडमिट असल्यामुळे मानसिक तणाव आणि त्यात पार्पिंगच्या जागेअभावी नातेवाईकांना प्रवेश मिळत नसल्यामुळे वाद विकोपाला जात आहे.
सीपीआरच्या आवारात वाहने लावण्यास जागाच उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बाहेर वाहने लावल्यास वाहतूक शाखेकडून कारवाई करून दंड वसूल केला जात असल्याने वाहने लावायची कुठे? प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्ण आणि नातेवाईकांना पार्पिंगच्या समस्येवरून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीपीआर प्रशासनाने पार्पिंगसाठी योग्य त्या जागेचे नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
प्रशासनाने तोडगा काढणे गरजेच
सीपीआरमध्ये येणारे कर्मचारी आणि इतर कामासाठी येणारे नागरिक जागा मिळेल तिथे वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे सीपीआरमध्ये वाहनांची कोंडी वाढतच आहे. त्यामुळे आत प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागतो. सीपीआरमध्ये प्रवेशावरून इथे येणारे रूग्ण आणि नातेवाईक यांच्यातील वादावादी नित्याचीच बनली आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.