For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीपीआर ‘सुरक्षा क्लिनिक’चे समुपदेशन गुप्तरोगावर लाभदायी

11:17 AM Dec 01, 2024 IST | Radhika Patil
सीपीआर ‘सुरक्षा क्लिनिक’चे समुपदेशन गुप्तरोगावर लाभदायी
CPR counseling at 'Suraksha Clinic' beneficial for treating genital warts
Advertisement

वेळीच उपचाराने लैंगिक संक्रमित आजाराला प्रतिबंध शक्य : तज्ञांशी स्पष्ट संवाद महत्वाचा

Advertisement

जागतिक एडस् निर्मूलन दिन विशेष

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 

Advertisement

जागतिक आकडेवारीनुसार 15-49 वयोगटातील अंदाजे 8 दशलक्ष प्रौढांना लैंगिक संक्रमित आजार (गुप्तरोग) ची लागण झाली होती. त्याचबरोबर 2022 मध्ये 1 कोटी 50 लाख गर्भवतींना गुप्तरोगाची लागण झाल्याचा अंदाज आहे. अलीकडच्या काही वर्षात लैंगिक संक्रमित आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनत आहे. वेळीच समुपदेशन व उपचाराने गुप्तरोगावर कायमस्वरूपी मात करता येणे शक्य आहे.

एचआयव्हीप्रमाणेच लैंगिंक संक्रमित आजाराचा संसर्ग हेण्याचा धोका असतो. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही, पण औषधोपचाराने प्रतिकारशक्ती वाढवून एचआयव्हीवर प्रतिबंध नक्कीच करता येतो. मात्र, गुप्तरोगावर योग्य व वेळेत उपचाराने कायमस्वरूपी मात करणे शक्य आहे. जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त लैंगिक संक्रमित आजाराची कारणे, लक्षणे व उपाय यांवर सुरक्षा क्लिनिकच्या अधिकारी श्रेया पाटील यांनी माहिती दिली.

लैंगिक संक्रमित आजारावर उपचार, समपुदेशनासाठी सीपीआर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकांतर्गत त्वचा व गुप्तरोग विभागात सुरक्षा क्लिनिक कार्यरत आहे. यामध्ये तज्ञांकडून समुदेशन व उपचाराने अनेक रूग्ण गुप्तरोगातून पुर्णपणे बरे झाल्याचे सीपीआरच्या त्वचा व गुप्तरोग नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले.

लैंगिक संक्रमित आजारांमुळे एचआयव्हीचा धोका 3 ते 5 पटीने वाढतो. लैंगिंक आजार व गुप्तरोगाविषयी आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्या तरी बऱ्याचदा रूग्णांकडून त्या स्पष्टपणे सांगितल्या जात नसल्यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता असते.

काय आहे लैंगिक संक्रमित आजार?

लैंगिक संक्रमित आजार असुरक्षित शरीरसंबंधामुळे होतात. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे आढळतात, काही लक्षणे विरहित असतात, परंतु योग्यवेळी उपचार न केल्यास असे आजार बळावू शकतात. संक्रमणांपैकी सिफिलीस, गोनोरिया, क्लिमीडिया आणि ट्रायकोमोनियासीस आदी गुप्तरोगाचे प्रकार आहेत. तज्ञांमार्फत रूग्णामधील गुप्तरोगाची लक्षणे ओळखता येतात. निदानानंतर संक्रमित व्यक्तीसह त्याच्या लैंगिक जोडीदाराला योग्य उपचार मिळू शकतात. काहीवेळा जनजागृती, प्र्रशिक्षणाचा अभाव व उपचाराकडे दुर्लक्षामुळेच गुप्तरोगाचा धोका वाढतो आहे.

प्रतिबंधात्मक उपाय : असुरक्षित लैंगिक संपर्क टाळणे, नवीन जोडीदाराच्या लैंगिक भूतकाळाबद्दल प्रामाणिक संभाषण, नियमितपणे असल्यास प्रतिबंधात्मक औषध घेणे.

पुरुषांमधील आजाराची लक्षणे

जननेंद्रियाला आग, जळजळ, स्त्राव होणे.

गुप्तांग, तोंडावर फोड, मुरूम, चामखीळ.

लघवी करताना जळजळ

महिलांमधील लक्षणे :

गुप्तांगाला आग, जळजळ, स्त्राव, दुर्गंधी येणे

ओटीपोटात वेदना, शारीरिक संबंधादरम्यान वेदना

चेहरा किंवा गुप्तांगावर जखमा, पुरळ, फोड येणे

लघवीवेळी जळजळ, अस्वस्थता

कारणे :

असुरक्षित लैंगिक संबंध, ओरल सेक्स, अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध

गुप्तरोग संसर्गचा पूर्वेतिहास, लैंगिक कार्यात गुंतण्यास भाग पाडले जाणे.

अमली पदार्थांचे व्यसन, इंजेक्शनद्वारे (ड्रग्सचा वापर).

आजाराचे परिणाम :

वंधत्व आणि पुनरुत्पादक आरोग्य समस्या

ओटीपोटाचा दाहक रोग व अस्वस्थता, गर्भधारणेची गुंतागुंत, गर्भाशय, गुदाशयाचा कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांची जळजळ.

सीपीआर सुरक्षा क्लिनिकशी संपर्क साधावा

लैंगिक संक्रमित आजाराची कोणतेही लक्षणे आढळल्यास याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. समुपदेशन व उपचारासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकांतर्गत त्वचा व गुप्तरोग विभागातील सुरक्षा क्लिनिक कार्यरत असून याचा लाभ घ्यावा.

                                                                                  सौ. श्रीया पाटील, समुपदेशक, सुरक्षा क्लिनिक, सीपीआर

Advertisement
Tags :

.