वाहतूक कोंडीत सीपीआर चौक
कोल्हापूर :
सीपीआर चौक म्हणजे रात्र-दिवस वर्दळीचा चौक. सीपीआरमधील रूग्णांची धावपळ, जोतिबा, पन्हाळा, तसेच कोकणात जाणारा मुख्य मार्ग. करवीर पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय,कसबा बावडा या मार्गावरील हा मुख्य चौक आहे. या चौकातच एसटी थांबा,वडाप, रिक्षाचे स्टॉप यामुळे हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे येथील वाहतुकीची कोंडी डोकीदुखी ठरत आहे.
येथील टाऊन हॉल एसटी बस स्टॉप सोयीस्कर ठिकाणी उभा करावा अशी येथील विद्यार्थाची व प्रवाशाची मागणी आह़े या स्टॉप समोरच अनधिकृत वडापच्या गाडया थांबलेल्या असतात़ तेथे रिक्षा स्टॉप असल्याने इथे वाहतुकीची मोठी केंडी होऊन अनेकवेळी वादावादी होण्याचे प्रकार होत आह़ेत. फळवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच फळांचा कचरा समोर रस्त्याच्या पलिकडे टाकलेला असतो. यामुळे परिसरात अस्वच्छता पहावयास मिळत आह़े
पंचायत समितीच्या दारातच विद्युत डीपी उघडाच आहे. यामुळे शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता आहे. चौकातच पोलिस वाहतूक कार्यालय असून, वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यालयाशेजारीच चारचाकी वाहने थांबलेली असतात. चौकातच 20 रिक्षासाठी रिक्षा स्टॉप आह़े मात्र रिक्षा इतरत्र दुसरीकडे उभ्या करुन वाहतुकीची कोंडी केली जात आहे. कचऱ्यामुळे दुर्गध़ी पसरलेली आहे. रस्त्याकडेला बांधकामाचे साहित्य पडलेले आहे. दसरा चौकातून सीपीआरकडे जाताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत़े दर रविवारी जोतिबा, पन्हाळ्याला जाणऱ्या पर्यटकाची मोठी गर्दी असत़े त्यामुळे या चौकात वाहतुकीची केंडी होत असत़े पुढच्या आठवड्यात जोतिबाची यात्रा असल्यामुळे वाहतुकीच्या केंडीत मोठी वाढ होणर आह़े यामुळे शहरातील वाहतुकीवर याचा बोजा पडणार आह़े
- निवारा शेडची सोय करावी
आम्ही शिक्षणासाठी अनेक वर्षापासून कोल्हापूरात येत आहोत. टाऊन हॉल येथे बांधीव शेड नसल्याने भर उन्हात, पावसाळयात तासन तास बस स्टॉपवर थांबावे लागत आह़े यासाठी एसटी महामंडळाने बांधीव शेडची सोय कराव़ी
- ज्योती पाटील़, विद्यार्थीनी