गोवेरी-म्हारसेवाडीत गव्यांचा उच्छाद
02:55 PM Feb 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वार्ताहर/कुडाळ
Advertisement
कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सात-आठ गव्यांचा कळप निदर्शनास आला.त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या या भागात गवारेड्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची, शेंगदाणा, कुळीथ, भाजीपाला लागवड केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Advertisement
Advertisement