Shahuwadi News | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर थरार! ३५ फूट उंचीवरून पडून 'गवा' गंभीर जखमी
म्हावळेवाडी येथे 35 फूट दरीत गवा पडून जखमी
शाहूवाडी -मलकापूर आंबा मार्गावर म्हावळेवाडी नजीक कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे रस्ता खुदायी काम सुरू आहे .याच ठिकाणी सुमारे 35 फूट अंतरावरून गवा पडून जखमी झाल्याची घटना घडली .बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदर घटना घडली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती . घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ भेट देऊन गव्यावर प्राथमिक उपचार केले .
आंबा मलकापूर मार्ग म्हावळेवाडी नजीकबुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्ता पार करताना सदर घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे .उंचीवरून गवा पडल्याने त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली . जखमी गव्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी वन विभागाने वैद्यकीय डॉक्टरांना पाचारण करून जखमी गव्यावर प्राथमिक केले .यावेळी वन विभागाचे पी बी चव्हाण , सुरेश पाटील ,अविनाश पाटील ,तुकाराम थोरवे,दिनकर पाटील , सर्जेराव पवार , दत्तात्रय मोकाटे ,रंगराव भोसले आदींच्या सह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
बग्यांची गर्दी आणि मोबाईल फोटोसाठी गर्दी -
घटनास्थळावर एक तर रस्ता खुदाईमुळे वाहतुकीला थोडीशी अडचण निर्माण होत आहे . याच ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . आणि अशा धोक्याच्या ठिकाणीच नागरिकांनी गर्दी करत मोबाईलवर फोटो आणि शूटिंग करण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती .