महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोविड गैरव्यवहार : अंतरिम अहवाल लवकरच सादर

10:22 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती : 20 नोव्हेंबरनंतर सरकारकडे अहवाल सादर होणार : पोटनिवडणुकीनंतर बैठकीत चर्चा

Advertisement

बेंगळूर : भाजप सरकारच्या कार्यकाळात कोविड साहित्योपकरणे खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांच्या आयोगाने दिलेला अंतरिम अहवाल 20 नोव्हेंबरनंतर राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. अहवालासंबंधी अध्ययन करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ सोमवारी पत्रकारांशी ते बेलत होते.

Advertisement

न्या. कुन्हा यांना न्यायाधीश म्हणून मोठा अनुभव आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालाविषयी संशय व्यक्त करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहाराविषयी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘राजकीय प्रेरित अहवाल’ असे वक्तव्य केले होते. 2019 मध्ये भाजप सत्तेवर असताना कोविडवरील औषधे, साहित्योपकरणे खरेदीत गैरव्यवहार झाला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत हा भ्रष्टाचार समोर ठेवून आम्ही लढा दिला. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर न्या. कुन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली आयोग नेमला होता. या आयोगाने वास्तविकतेनुसार अध्ययन करून अंतरिम अहवाल दिला आहे, असे डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.

पीपीई किट खरेदीत 14 कोटींचा भ्रष्टाचार

पीपीई किट राज्यात कमी किमतीत उपलब्ध असताना देखील चीनकडून 3 हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. केवळ पीपीई किट खरेदीत 14 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख अहवालात आहे. काँग्रेस पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करत नाही. सर्व भारतीय एकच आहेत. दलित, मागासवर्गीय शैक्षणिक,  आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तसेच सर्वांसाठी गॅरंटी योजना दिल्या आहेत. या बाबतीत भेदभाव नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

पंतप्रधानांचे आरोप खोटे

मद्यविक्रेत्यांकडून 700 कोटी रुपये जमा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पाठविण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर केला आहे. हा आरोप खोटा आहे. भाजप नेत्यांनी आरोप केला असता तर त्यावर प्रत्युत्तर देण्याची गरज भासली नसती. परंतु, पंतप्रधानांवरच खोटे बोलण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी कर्नाटक काँग्रेसला पैसे पाठविण्याची गरजच नाही. तेथील पक्षाच्या खर्चासाठी महाराष्ट्र काँग्रेस समिती आहे, असे स्पष्टीकरण देत डॉ. परमेश्वर यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप केला.

प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार

कोविड काळातील भ्रष्टाचारासंबंधी तपास करून अहवाल दिलेल्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांचा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अवमान केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. सोमवारी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल थावरचंद्र गेहलोत यांची राजभवन येथे भेट घेऊन जोशींविरुद्ध तक्रार केली. कुन्हा हे न्यायाधीश नव्हेत, ते राजकीय एजंट आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने कुन्हा यांनी अहवाल दिला आहे. असे वादग्रस्त वक्तव्य करून प्रल्हाद जोशी यांनी निवृत्त न्या. कुन्हा यांचा अवमान केला आहे. त्यामुळे जोशींवर कारवाई करावी. तसेच ही बाब राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article