जोडीदाराच्या शोधात ४००० किमी पार
वंश वाढविण्याची इच्छा केवळ माणसांपुरती मर्यादित नाही. जंगलाच्या जगतातही यासाठी संघर्ष होत असतो. आफ्रिकेच्या जंगली श्वानांची प्रजाती सध्या धोक्यात आहे. जगात त्यांची संख्या सुमारे 6600 इतकीच शिल्लक आहे. हे श्वान 39 वेगळ्या समुहांमध्ये विभागले गेले आहेत. हे श्वान मादीला शोधण्यासाठी पूर्ण खंडात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, अशाचप्रकारे तीन श्वानांनी 8 महिन्यामंध्ये 4126 किलोमीटरचा प्रवास केल्याचे एका नव्या शोधातून समोर आले आहे.
हा कुठल्याही आफ्रिकन मॅमल म्हणजे सस्तन प्राण्याचा आतापर्यंत सर्वात लांब नोंदविलेला प्रवास आहे. हे अध्ययन इकोलॉजी नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी जाम्बियाच्या जंगली श्वानांच्या समुहांना जीपीएस लावून ट्रॅक केले. हे श्वान झाम्बियामधून बाहेर पडत 5 शेजारी देशांमध्ये किंवा त्यांच्या नजीक पोहोचले.
4 वेगवेगळ्या समुहांनी मिळून 9863 किलोमीटरचा प्रवास केला. हे अंतर अमेरिकेच्या रुंदीपेक्षा दुपटीने अधिक आहे. 1991 पासून आम्ही या श्वानांचे अध्ययन करत आहोत. 2026 मध्ये पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश श्वानांचे समूह परस्परांशी अद्याप जोडलेले असल्याचे आम्हाला कधीच वाटले नव्हते असे उद्गार मुख्य संशोधक स्कॉट क्रेल यांनी काढले आहेत.
जंगली श्वानांचे सामाजिक जीवन
आफ्रिकन जंगली श्वान कठोर नियमयुक्त झुंडीत राहतात. सर्वसाधारणपणे झुंडीत केवळ शक्तिशाली जोडीच प्रजनन करू शकते. उर्वरित सदस्य खासकरून दोन आणि तीन वर्षांचे युवा श्वान साथीदार शोधणे आणि नवा भाग निर्माण करण्यासाठी झुंड सोडून देतात. अध्ययनानुसार उर्वरित सदस्य प्रमुख होण्याची प्रतीक्षा करतात. हे श्वान जवळच्या श्वानांना मदत करून स्वत:चा फायदा घेतात, किंवा मग त्वरित प्रजननाच्या संधीच्या शोधात बाहेर पडतात. याचमुळे ते इतक्या लांबचा प्रवास करतात. हा प्रवास सोपा नसतो. अनेक श्वान वाटेत मृत्युमुखी पडतात. बहुतांश मृत्यू बुशमीट शिकारीसाठी सापळ्यात अडकून होत असतात.
एक मादी श्वान जिचा कोड ईडब्ल्यूडी-1335 होता, ती झाम्बियापासून 2300 किलोमीटरचा प्रवास करून मोझाम्बिकमध्ये पोहोचली. तेथे जून 2022 मध्ये तेथे ती सापळ्यात अडकून मृत्युमुखी पडली. झाम्बियन र्वार्निवोर प्रोग्रामच्या टीमने या श्वानांना ट्रॅक केले. हे श्वान वारंवार नद्या पार करतात. मोठ्या रस्त्यांना पार करत ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या पर्वतांवर चढतात-उतरतात आणि शहरे तसेच सरोवरांच्या काठावरून जाताना दिसतात.
मानवी वस्तीदरम्यानही संपर्क
झाम्बियाची लोकसंख्या 2010 नंतर सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे जंगली श्वानांचे अधिवास विभागले गेले आहेत. देशाचा सुमारे 40 टक्के हिस्सा संरक्षण क्षेत्र घोषित आहे, परंतु निधीची मोठी कमतरता आहे. तरीही जंगली श्वान मानवबहुल भागांमधून जात दीर्घ अंतर कापत आहेत. श्वान आम्हाला कनेक्टिव्हिटी अद्याप काम करत असल्याचे दाखवून देत आहेत. आता आम्हला त्याला वाचविणे आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा शोध संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. वेगवेगळे समूह परस्परांपासून तुटले असल्याचे पूर्वी मानले जात होते, परंतु आता हे श्वान अद्याप परस्परांपर्यंत पोहोचू शकतात हे स्पष्ट असल्याचे झाम्बियन कार्निवोर प्रोग्रामचे सीईओ मॅट बेकर यांनी सांगितले.
जर प्रवासाचे मार्ग म्हणजेच कॉरिडॉरला सुरक्षित ठेवण्यात आल्यास पूर्ण खंडात त्यांची सुरक्षा सुधारू शकते. आफ्रिकन जंगली श्वानांना अनेक धोके आहेत. यात अधिवास संपुष्टात येणे, शिकारीची कमतरता, शिकारी सापळे, आजार आणि माणसांशी संघर्ष सामील आहे. दीर्घ अंतर कापण्याची क्षमता जर मार्ग खुले ठेवण्यात आल्यास हे समूह एकमेकांशी जोडून मजबूत होऊ शकतात हे दाखविते.
संरक्षणाची नवी दिशा अन् आव्हाने
केवळ संरक्षित क्षेत्रांना वाचविणे पुरेसे नाही. त्यांच्यादरम्यान कॉरिडॉरही सुरक्षित ठेवावे लागतील. हे कॉरिडॉर नद्या, रस्ते आणि शहरांमधून जातात. माणसांची वाढती संख्या आणि शेतीच्या सातत्याच्या विस्तारामुळे हे मार्ग बंद होत राहिले आहेत. शिकारी सापळ्यांची समस्याही वाढली आहे. बुशमीटसाठी पेरण्यात आलेले सापळे अनेकदा जंगली श्वानांसाठी जीवघेणे ठरतात. आजाराचाही धोका कायम राहतो. दीर्घ प्रवासात ते इतर प्राण्यांच्या संपर्कात येऊ शकतात. स्कॉट क्रेल वैज्ञानिक दनीर्घकाळापासून या प्राण्यांवर नजर ठेवून आहेत.