महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

न्यायालये सोमवारपासून गजबजणार

06:22 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

न्यायालयांना उन्हाळी सुटी जाहीर झाली होती. दरवर्षी न्यायालयांना एक महिना सुटी दिली जाते. यावर्षीही एप्रिल अखेरपासून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर आता सोमवारपासून न्यायालयांच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालये गजबजणार आहेत.

Advertisement

दिवाणी व जिल्हा न्यायालयांना सुटी दिली जाते. याचबरोबर काही जेएनएमसी न्यायालयांनादेखील सुटी देण्यात येते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून न्यायालयामध्ये काहीसा शुकशुकाट पसरला होता. आता सोमवारपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे.

बेळगावातील न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित आहेत. त्या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा, अशी पक्षकारांची अपेक्षा असते. मात्र विविध सुट्या, तसेच इतर कारणांनी खटले प्रलंबित राहत आहेत. आता सोमवारपासून न्यायालये सुरू होणार असल्याने पक्षकारांनाही दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article