For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nasrpur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणात फाशीची शिक्षा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

06:09 PM Jun 29, 2026 IST | NEETA POTDAR
nasrpur case   नसरापूर अत्याचार  प्रकरणात फाशीची शिक्षा  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले
Advertisement

पुणे -पुण्यातील या नसरापूर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून आज पुणे सत्र न्यायालयात निकाल पार पडला.. आज पुणे सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे.. या संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या नरसापूर प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंर सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पावसाळी अधिवेशनात या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अल्पावधीत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर न्यायालयानेही या प्रकरणाला प्राधान्य देत सलग सुनावणी घेतली. कमी कालावधीत साक्षीदारांचे जबाब, उलटतपासणी आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने दोष निश्चित केला आणि त्यानंतर अंतिम शिक्षेचा निर्णय सुनावला.

Advertisement

फडणवीस यांनी आपल्या भाषणात विशेष न्यायालयाच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला. या खटल्याची सुनावणी कोणताही अनावश्यक विलंब न करता पूर्ण करण्यात आली. यासाठी न्यायालयाने सातत्याने काम करत प्रकरणाला प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले. तपास यंत्रणा, सरकारी पक्षाचे वकील आणि न्यायालय यांच्या समन्वयामुळे इतक्या कमी कालावधीत निकाल लागणे शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केवळ 29 दिवसात 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन फाशीची शिक्षा झालेली आहे. मी न्यायालयाचे विशेष आभार मानतो. कारण आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत प्रकरण पोलिसांच्या हातात असते. त्यानंतर संबंधित प्रकरण हे न्यायालयाच्या हातात असते. म्हणूनच मी न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो. कारण या प्रकरणाची सलग सुनावणी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या सुट्ट्यादेखील रद्द केल्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

नसरापूर प्रकरणाचा हा निकाल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये जलद तपास आणि वेगवान न्यायप्रक्रिया कशी राबवता येते, याचं महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणूनही पाहिला जात आहे. त्यामुळे या निकालाची चर्चा आता राज्यभर सुरू असून, पीडितेला न्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.