10 वर्षांनी वेगळे झाले कोर्टनी अन् जॉन मॅकडॅड
प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’ची अभिनेत्री कोर्टनी कॉक्स आणि ‘स्नो पेट्रोल’ बँडचा म्युझिशियन जॉनी मॅकडॅडचे नाते आता संपुष्टात आले आहे. दोघेही 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकत्र होते.
कोर्टनी आणि जॉनी यांची भेट 2013 च्या अखेरीस एका हाउस पार्टीत झाली होती. ज्यानंतर दोघांनी डेटिंग सुरु केले होते. नात्याच्या 9महिन्यांनीच दोघांनी एंगेजमेंट केली होती. परंतु 2015 च्या अखेरीस ही एंगेजमेंट मोडली होती. तर 2016 मध्ये दोघे पुन्हा एकत्र आले होते. या जोडीला सप्टेंबर 2025 मध्ये ‘युएस ओपन’दरम्यान अखेरचे एकत्र पाहिले गेले होते. परंतु आता 10 वर्षांनी कोर्टनी कॉक्स आणि जॉनी हे वेगळे झाले आहेत.
2015 साली जेव्हा पहिल्यांदा ब्रेकअप झाला होता, तेव्हा तो एका कपल्स थेरपी सेशनदरम्यान झाला होता. जॉनी ब्रेकअप करणार आहे याची कल्पनाही मला नव्हती. मी दु:खात बुडाले होते. परंतु जॉनीही नात्यात अत्यंत त्रासा होता, याचमुळे त्याने स्वत:च्या भल्यासाठी असे केले होते असे कोर्टनीने 2024 साली एका मुलाखतीत सांगितले होते.