For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime News | पत्नीचा मोबाईल, शिवीगाळ अन् पाठीवर सपासप वार; शिवथरमधील 'त्या' हल्ल्याचे गुपित उघड!

05:05 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime news   पत्नीचा मोबाईल  शिवीगाळ अन् पाठीवर सपासप वार  शिवथरमधील  त्या  हल्ल्याचे गुपित उघड
Advertisement

                                       ग्रामपंचायत वादातून कोयता हल्ला

Advertisement

सातारा - ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने १ वर्षे साधी कैद व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ३० दिवसांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे.

या प्रकरणातील आरोपी विशाल दयानंद साबळे (वय ४०, रा. शिवथर, ता. जि. सातारा) याने दि. १४ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादीच्या गैरहजेरीत त्यांच्या पत्नीचा मोबाईल घेऊन फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी घरी परतल्यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या ऊसतोडीच्या कोयत्याने त्यांच्या पाठीच्या डाव्या बाजूस पाच ते सहा वार केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर जखम झाली.

Advertisement

या घटनेप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १६३/२०२४ अन्वये भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आर. जी. गोरे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सदर खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सातारा येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती दवडते यांनी बाजू मांडली. एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या साक्षींवरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.

मा. मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रम एम. कऱ्हाडकर यांनी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी निकाल देत आरोपीस भादंवि कलम ३२४ व ३२३ अन्वये १ वर्षे साधी कैद व १०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने काम पाहिले.

Advertisement
Tags :

.