For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूंछमधील घटनेची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ सुरू

06:51 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
पूंछमधील घटनेची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ सुरू
Advertisement

ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह चौघांवर कारवाई ;  चकमकीदरम्यान 3 नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी तपासाला गती

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये 21 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख मनोज पांडे सोमवारी पूंछला पोहोचले. लष्करप्रमुखांनी येथील कमांडर्सची भेट घेऊन त्यांना व्यावसायिक पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. लष्करप्रमुखांच्या दौऱ्यापूर्वीच लष्कराने सैनिकांविऊद्ध कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू केली आहे. लष्कराने सुरनकोट बेल्टचे प्रभारी ब्रिगेडियर स्तरावरील अधिकारी आणि 48 राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना त्यांच्या सध्याच्या कर्तव्यावरून हटवले आहे.

Advertisement

पूंछमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीवेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. सुरणकोट भागात झालेल्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले.  जवान हुतात्मा झाल्यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी चौकशीसाठी नेण्यात आलेल्या 8 संशयितांपैकी तिघांचे मृतदेह 22 डिसेंबर रोजी सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविऊद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 21 डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी पॅसिस्ट फ्रंटने (पीएफएफ) स्वीकारली होती.

सुरक्षा दलांनी चौकशीसाठी उचललेल्या तिघांचे मृतदेह सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच भडकले होते. सफीर अहमद, मोहम्मद शौकत आणि शब्बीर अहमद अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मारहाणीत झालेल्या जखमांमुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चौकशीदरम्यान जवानांनी या लोकांशी कडकपणा दाखवला होता. त्याच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या होत्या. यानंतर लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. तथापि, लष्कराचे काउंटर इनसर्जन्सी युनिट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार आणि पॅम्पमध्ये ग्रेनेडचा स्फोट केला होता. यात तीन अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी जखमी झाले होते.

गेल्या चार दिवसांपासून पूंछ आणि राजौरीमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले होते. सोमवारीही शोधमोहीम सुरूच होती. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राजौरी, पूंछ आणि बाफलियाजमध्ये अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

4 जवानांची केली बदली

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जवानांविऊद्ध आयपीसी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्याचे प्रकरण विशेष स्वरूपाचे असल्याने तपास पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे विशेष अहवाल सादर केला जाईल. ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी आणि 48 राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर सरकारने तीन मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

राजौरीमध्ये 30 दहशतवादी सक्रिय

सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी सुमारे 30 पाकिस्तानी दहशतवादी राजौरीच्या जंगलात लपून बसले आहेत. 16 डिसेंबरलाही बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्तचरांचा हवाला देऊन माहिती दिली होती. पाकिस्तान सीमेवर 250 ते 300 दहशतवादी लॉन्चपॅडवर असल्याचा दावा बीएसएफ अधिकाऱ्यांनी केला होता. हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे सीमेवरील सुरक्षा सैनिकांना अधिक सतर्क करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.