For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोक्सो प्रकरणातील संशयिताला न्यायालयाकडून जामीन

06:03 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोक्सो प्रकरणातील संशयिताला न्यायालयाकडून जामीन
Advertisement

त. भा. प्रतिनिधी /बेळगाव

Advertisement

पोक्सो प्रकरणात कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील एका 20 वर्षीय तरुणाला जिल्हा पोक्सो व जलदगती न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. लवकरच संबंधित तरुणाची कारागृहातून सुटका केली जाणार आहे.

खानापूर तालुक्यातील 20 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने हब्बनट्टी येथील जंगल परिसरात फिरावयास नेले. त्यानंतर दुसऱ्या वेळी दोघेही बसने पंढरपूर, कोल्हापूर आणि पुण्याला गेले. दोघेही जवळपास 20 दिवस या काळात एकत्र होते. पैसे संपल्यानंतर प्रियकराने तिला तिच्या घरी सोडून दिले. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजताच याप्रकरणी तरुणावर 5 एप्रिल 2026 रोजी खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तरुणावर 96, 64 (2) (एम) बीएनएस सेक्शन 4 आणि 6 नुसार पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला. संशयिताला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. तरुणाला जामीन मंजूर करण्यात यावा यासाठी अॅड. सिद्धार्थराजे एस. सावंत यांनी जिल्हा पोक्सो आणि जलदगती न्यायालयात अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाच्या एका निकालाचे उदाहरण देत आपल्या अशिलाला जामीन मंजूर करावा. त्यासाठी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद केला. त्यामुळे न्यायालयाने संशयित तरुणाला जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. सिद्धार्थराजे सावंत काम पाहत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.