हॉटेल मालकासह मद्यपींना न्यायालयाने ठोठाविला दंड
कोल्हापूर :
मद्य विक्रीचा परवाना नसताना स्वत:च्या जागेमध्ये अवैधरित्या एकापेक्षा जास्त लोकांना दाऊ पिण्यासाठी जागा उपलब्ध कऊन, त्यांना सुविधा पुरविल्याप्रकरणी न्यायालयाने खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील हॉटेल ओमसाईचे मालक अनिल दादू पाटील (रा. कुंभार गल्ली, कौलव, ता. राधानगरी) याला 25 हजार ऊपयांचा दंड, दंड न भरल्यास 14 दिवसाची साधी कैद. पाच मद्यपींना प्रत्येकी 1 हजार 500 ऊपयांचा दंड, दंड न भरल्यास 7 दिवसाची साधी कैद अशी शिक्षा ठोठाविली.
कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावरील खिंडी व्हरवडे येथे अनिल पाटीलने स्वत:च्या जागेमध्ये ओमसाई नावाने हॉटेल सुऊ केले आहे. येथे त्यांनी मद्य विक्री करण्याचा परवाना घेतला नसताना, हॉटेलमध्ये मद्य विक्री कऊन, मद्यपींना बसण्यास जागा दिली होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाला मिळाली. त्यावऊन या विभागाने हॉटेलवर 13 रोजी छापा टाकला. यामध्ये 9 हजार 210 ऊपये किंमतीच्या देशी-विदेशी दाऊसह अन्य साहित्य जप्त करीत, हॉटेल मालक अनिल पाटील, मद्यपी सुरज बळवंत माळवी (रा. गुडाळ), वैभव चंद्रकांत पताडे (रा. बनाचीवाडी), तनाजी आनंदा गुरव, माऊती रामचंद्र गुरव (दोघे रा. खिंडी व्हरवडे) या पाच जणांना अटक केली. त्याच्याविरोधी महाराष्ट्र दाऊबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याचा तपास कऊन राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अनिल पाटीलसह पाच मद्यापींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर सहा आरोपींनी 32 हजार 500 ऊपयांचा दंड न्यायालयात भरणा केला.