For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

चीनमध्ये एकाच नावाच्या जोडप्याचा विवाह

06:42 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीनमध्ये एकाच नावाच्या जोडप्याचा विवाह
Advertisement

प्रत्येक ठिकाणी होतेय गडबड

Advertisement

चीनमध्ये एक विवाह सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचे कारण कुठलीही महाग सजावट किंवा अनोखी प्रथा नसून वधू अन् वराचे एकसारखे नाव असणे आहे. दोघांच्या नावाचे स्पेलिंगच नव्हे तर चिनी भाषेत लिहिण्यात येणारी अक्षरेही एकसारखी आहेत. दोघेही एकाच क्षेत्रात काम करतात, या अनोख्या योगायोगाला पाहून लोक याला नशीबाचा खेळ संबोधित आहेत.

चीनच्या झेजियांग प्रांतात 6 ऑक्टोबर रोजी झू शियाओछोंग आणि 28 वर्षीय झू शियाओछोंग यांचा यांचा विवाह झाला. दोघांचेही नाव चिनी भाषेत अत्यंत एकसारखे लिहिले जाते. विवाहाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. पोस्टरवर वधू अन् वराचे एकसारखे नाव पाहिल्यावर लोक चकित झाले. आमचे काही नातेवाईक, जे वराला ओळखत नव्हते, त्यांना विवाहाचे पोस्टर तयार करताना काही चूक झाल्याचे वाटले असे वधूचे सांगणे आहे.

Advertisement

नोकरीच्या मुलाखतीतही योगायोग

या दांपत्याची कहाणी केवळ विवाहानंतर चर्चेत आली नाही. 2016 मध्ये दोघेही एका जॉब फेयरमध्ये पोहोचले होते, तेथे मुलाखत घेणाऱ्याने झू शियाओछोंग नाव पुकारले असता दोन्ही उमेदवार एकाचवेळी उभे राहिले. त्यावेळी दोघांनीही याला एक योगायोग मानले होते. नंतर वराचा एक सहकारी जो वधूचा देखील सहकारी होता, त्याने दोघांचे नाव एकच असल्याची बाब ओळखली आणि त्यांची भेट घडवून आणली. त्यानतर दोघांनी 2019 मध्ये डेटिंग सुरु केले होते.

एकाच नावामुळे अनेकदा समस्या

दोघांचे नाव एकसारखे असल्याने दैनंदिन कामांमध्येही समस्या निर्माण झाल्या. विवाहाची नोंदणी करविणे आणि घराची कागदपत्रे तयार करविताना कॉम्प्युटर सिस्टीम त्यांच्या रिकॉर्डला आपोआप प्रोसेस करू शकली नव्हती. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना दस्तऐवजांची तपासणी करून हातांनी नोंद करावी लागली. एकदा प्रवासादरम्यान दोघांनी चुकून परस्परांचा बोर्डिंग पास उचलला, तिकीटावर नाव एकसारखे होते आणि इतर माहिती दिसत नव्हती. यामुळे विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळखीची पुन्हा तपासणी करावी लागली होती.

मुलाचेही नाव असेच ठेवा!

एकच नाव असल्याने मित्रांदरम्यान देखील अनेकदा गोंधळ उडायचा. जेव्हा कुणी झू शियाओछोंग असे पुकारायचा, तेव्हा पती-पत्नी दोघेही प्रतिसाद देऊ लागायचो. या समस्येपासून वाचण्यासाठी लोकांनी पतीला ‘दा छोंग’ आणि पत्नीला ‘शियाओ छोंग’ अशी हाक मारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर या कहाणीवरून लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी तर सूचना केली आहे की, भविष्यात त्यांच्या घरात मूल जन्माला आल्यास त्याचे नाव ‘छोंगछोंग’ ठेवण्यात यावे. अनेक लोकांना हा योगायोग इतका खास वाटला की त्यांनी याला नशीबाचा खेळ ठरविले आहे.

Advertisement
Tags :

.