For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरावर माड कोसळून दांपत्य जखमी

05:57 PM Apr 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
घरावर माड कोसळून दांपत्य जखमी
Advertisement

माडखोल- देऊळवाडी येथील घटना

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका माडखोल गावालाही बसला. माडखोल देऊळवाडी येथे मध्यरात्री चंद्रकला रामचंद्र लाड यांच्या घरावर माडाचे झाड कोसळल्याने मुलगा अजित रामचंद्र लाड आणि सून तनु अजित लाड हे दांपत्य जखमी झाले. घरावर माड कोसळल्यानंतर छपरावरील कौले तसेच फॅनचे पाते अंगावर कोसळल्याने हे दाम्पत्य जखमी झाले. तसेच या घटनेत घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच या गावातील सुवर्णा सुभाष ठाकुर, चंद्रकांत आत्माराम राऊळ, उर्मिला लवू सावंत, आनंद गणू म्हालटकर, सुवर्णा सुरेश म्हालटकर, विश्राम काशिराम लातये, बाबुराव भगवान जाधव, रामचंद्र मालू जाधव, द्रौपदी गुणाजी जाधव, वंदना मोतिराम जाधव, मंदाकिनी मनोहर माडखोलकर यांच्या घरावर माड आंबा कोकम यांची झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.