महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गॅस दुर्घटनेतील दाम्पत्याचा अखेर मृत्यू

11:23 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा दिवस मृत्यूशी झुंज : घटनेने सुळगा गावात हळहळ

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. 18 मे रोजी सिलिंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. 24 मे रोजी सायंकाळी खासगी इस्पितळात दाम्पत्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय 65) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय 61) हे दोघेही शनिवार दि. 18 मे रोजी घरामध्ये सिलिंडर गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी खासगी इस्पितळात हलविले होते. मात्र उपचार सुरू असताना सहा दिवसांनंतर मृत्यू ओढवला आहे. सदर दाम्पत्य दुमजली घरात झोपले होते. पहाटे स्वयंपाक घरात येऊन विद्युत लाईट सुरू करताच आगीचा भडका उडाला होता. रेग्युलेटरमधून गॅस गळतीमुळे हा अपघात घडल्याचे समजते. सहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज देत अखेर दाम्पत्याचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने सुळगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दाम्पत्यावर सुळगा स्मशानभूमीत शनिवार दि. 25 मे रोजी सकाळी 11.30 वा. अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article