For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेतोरेत गोवा बनावटीच्या दारू विक्री प्रकरणी दांपत्यावर गुन्हा

12:30 PM Jun 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेतोरेत गोवा बनावटीच्या दारू विक्री प्रकरणी दांपत्यावर गुन्हा
Advertisement

पावणे दोन लाखाची दारु हस्तगत

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

वेतोरे-देऊळवाडी येथे बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवलेल्या व पोलीसांना हुलकावणी देत बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या शंकर सातार्डेकर दांपत्यास वेंगुर्ले पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारांस अचानक धाड टाकत १,७९,००० हजार रूपयाच विविध ब्रॅण्डचा गोवा बनावटी दारूचा मुद्देमाल रंगेहाथ पकडत जप्त केला. या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) ८१.८३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.वेतोरे देऊळवाडी येथे राहणारे शिवानी शंकर सातार्डेकर व शंकर काशिराम सातार्डेकर हे गोवा बनावटीची दारू साठा करून ती विक्री करत असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ले पोलीसांना मिळाली होती. मात्र सदर व्यक्तीअगोदर पोलीसांना हुलकावणी देत आपण असे कांहीच करत नसल्याचे भासवत असल्याचे समजते. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोजा, जयेश सरमळकर, मनोज परूळेकर, गजानन देसाई, महिला होमगार्ड श्रीमती डिसोजा या पथकाने शनिवारी रात्री उशीरा सापळा रचून अकस्मित धाड टाकली. या धाडीत डी.एस.पी. ब्लॅक, मॅगडॉल, रॉयल स्टँग, होडका, डॉक्टर बॅण्डी, रम या नावाच्या १८० मिली मापाच्या बॉटल्स तसेच किंगफिशर बियरचे बॉक्स सुमारे किंमत रू १,७९,००० चा गोवा बनावटी दारूचा मुद्देमाल सापडला असून तो पोलीस पथकाने जप्त केला आहे. यावेळी पोलीस पाटील सुशांत नाईक वेतोरे च्या पोलीस पाटील राधिका गावडे आदी उपस्थित होते.या प्रकरणी गोवा बनावटीच्या दारूचा माल बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने साठा करून बाळगल्याप्रकरणी शिवानी शंकर सातार्डेकर व शंकर काशिराम सातार्डेकर यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) ८१.८३ प्रमाणे वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.