जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न
12:43 PM Feb 14, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. शेतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रश्न सुटत नसल्याने, या दाम्पत्याने अखेर रॉकेलचे कॅन घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस आणि या दाम्पत्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत रॉकेलचे कॅन काढून घेतलेत्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Advertisement
Advertisement
Advertisement