महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालदीवमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न : मुइज्जू

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरकारी बँकेकडून विदेशी चलनातील व्यवहारांवर बंदी

Advertisement

वृत्तसंस्था/मालदीव

Advertisement

मालदीवमध्ये अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यानी विरोधी पक्षांवर वित्तीय सत्तापालटाचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे. माझे सरकार पाडविण्याच्या कटामागे असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुइज्जू यांनी म्हटले आहे.  प्रत्यक्षात रविवारी बँक ऑफ मालदीवने (बीएमएल) डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी विदेशी चलनात व्यवहार करण्यावर बंदी घातली होती. बँकेने गोल्ड  क्रेडिट कार्डची मर्यादा देखील कमी करत 100 अमेरिकन डॉलर्स केली होती.

या निर्णयामुळे देशात महागाई आणि आर्थिक अस्थिरतेचा धोका निर्माण झाला. मुइज्जू सरकारला या निर्णयांबद्दल कळल्यावर त्वरित ते मागे घेण्यात आले. आता मुइज्जू यांनी याला सत्तापालटाचा प्रयत्न ठरविले आहे. बँकेने हा निर्णय न कळविता घेतला आहे. सामान्य ज्ञान असणारा व्यक्तीही हे निर्णय का घेण्यात आले हे जाणून आहे. आम्हाला या निर्णयांबद्दल कळताच आम्ही त्यावर उपाययोजना सुरू केल्याचे मुइज्जू यांनी स्वत:च्या पक्षाच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे. सत्तापालट रोखण्यासाठी राज्यघटनेकडुन मिळालेल्या प्रत्येक शक्तीचा वापर करणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीवर सरकार कुठल्याही प्रकारे प्रभाव पाडणार नाही. चौकशीनंतर निर्णय दिला जाईल आणि दोषींना तुरुंगात डांबले जाईल असा दावा मुइज्जू यांनी केला आहे.

बीएमएल एक सरकारी बँक असून यात सरकारची हिस्सेदारी 62 टक्के आहे. एका सरकारी बँकेने अखेर असे निर्णय कसे घेतले अशी विचारणा लोक करत आहेत. परंतु बीएमएलच्या संचालक मंडळात सरकारला बहुमत नाही. 9 पैकी 4 संचालक हे सरकारकडून नियुक्त आहेत. तर उर्वरित 5 संचालकांना सरकारने नियुक्त केलेले नाही असा दावा मुइज्जू यांनी केला. याचदरम्यान बीएमएलच्या संचालक मंडळातील 9 पैकी 6 संचालक सरकारनेच नियुक्त केल्याचा दावा मालदीवमधील अधाधू या वृत्तपत्राने केला आहे. तसेच मालदीवचा विदेशी चलन साठा जवळपास संपुष्टात आल्याचेही अधाधूकडून सांगण्यात आले आहे.  जुलै 2024 पर्यंत मालदीवचा विदेशी चलन साठा 388.41 दशलक्ष डॉलर्स होता. मालदीव मौद्रिक प्राधिकरणाने ऑगस्टच्या अखेरपर्यंत देशाचा विदेशी चलन साठा संपुष्टात येणार असल्याची भीती यापूर्वी व्यक्त केली होती.

लवकरच होणार सत्तापालट : विरोधी पक्ष

मुइज्जू यांचे दावे हास्यापद असल्याचे वक्तव्य मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष फैयाज इस्माइल यांनी केले आहे. समस्या मुइज्जू यांच्या पक्षात आहे. मुइज्जू यांच्या सरकारला बाहेरून नव्हे तर स्वत:च्या पक्षाकडूनच धोका निर्माण झाला आहे. आगामी काळात पक्षातच फूट पडल्याचे दिसून येईल असा दावा त्यांनी केला.

देशासमोर संकट

मध्यवर्ती बँकेला नियंत्रित करणारे अध्यक्षच त्यावर आरोप करत आहेत. हा प्रकार बँकेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांदरम्यान बँकेबद्दलचा विश्वास कमी होणार असल्याची टीका फैयाज यांनी केली आहे. देशाची जनता उपासमारीच्या स्थितीत पोहोचल्याची जाणीव आम्हाला आहे. सरकारकडे अद्याप चुका सुधारण्याची संधी आहे. परंतु अध्यक्ष मुइज्जू यांचा हट्ट आणि हुकुमशाही वर्तनामुळे स्थिती हातातून निसटत चालली आहे. मुइज्जू हे स्वत:चे मानसिक संतुलन गमावत चालल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्याने केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article