महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बोलिव्हियामध्ये सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रपतींच्या राजवाड्याला सैनिकांचा वेढा, लष्करी जनरलना अटक : लष्करी वाहनाने घुसण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था /ला पाझ

Advertisement

दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियामध्ये सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी झाला. बोलिव्हियन सैनिकांनी राजधानी ला पाझमधील राष्ट्रपतींच्या राजवाड्यावर हल्ला केल्यानंतर लष्कराचे सर्वोच्च जनरल जोस झुनिगा यांनी काही लष्करी सदस्यांसह लष्करी वाहनातून राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. बोलिव्हियन टेलिव्हिजनवर त्याचे थेट प्रक्षेपण झाले. व्हिडिओनुसार, बुधवारी बोलिव्हियाच्या सुरक्षा दलांनी शहराच्या मुख्य चौकाला वेढा घातल्यानंतर लष्करी वाहन राष्ट्रपती भवनाच्या दरवाजावर धडकू लागले. यावेळी जवानांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, सरकारच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली. त्यांना रोखण्यासाठी जवानांनी अश्रुधुराचाही वापर केला.

आपल्याला देशात लोकशाहीची पुनर्रचना करायची आहे. आम्ही राष्ट्राध्यक्ष लुईस आर्स यांचा आदर करतो, पण देशाच्या सरकारमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे, असे लष्करप्रमुख जनरल होजे म्हणाले. हल्ल्यानंतर सैन्याने काही वेळातच माघार घेतली आणि जनरल होजे यांना अटक करण्यात आली. अयशस्वी सत्तापालटानंतर राष्ट्रपतींनी लोकशाहीच्या रक्षणासाठी देशातील जनतेने एकत्र येण्याची गरज आहे. हा बोलिव्हियन लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article