For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sawantwadi Election | सावंतवाडीत उद्या मतमोजणी; कसं असणार संपूर्ण नियोजन जाणून घ्या

03:17 PM Feb 08, 2026 IST | NEETA POTDAR
sawantwadi election   सावंतवाडीत उद्या मतमोजणी  कसं असणार संपूर्ण नियोजन जाणून घ्या
Advertisement

                             सावंतवाडी जिमखाना मैदानात सोमवारी सकाळी मतमोजणी सुरू

Advertisement

सावंतवाडी (संतोष सावंत ) : सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आठ व पंचायत समिती 17 जागांसाठी एकूण 72 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे महिलांपेक्षा पुरुष मतदार ची संख्या 3000 आणि अधिक आहेत्यामुळे पुरुष मतदार अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत उद्या सोमवारी 10 फेब्रुवारी सावंतवाडी जिमखाना मैदान बॅडमिंटन हॉल येथे मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू केले जाणार आहे मतमोजणीसाठी कडे कोट पोलीस बंदोबस्तठेवण्यात येणार आहे .सर्वात प्रथम टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

सर्वात पहिला माडखोल जिल्हा परिषदेचा निकाल जवळपास.अकरा वाजता हाती लागणार आहे त्यानंतर शेवटचा निकाल दुपारी अडीच वाजता बांदा पंचायत समितीचा लागणार आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निहाय मतमोजणीलाअवघे पंधरा मिनिटं निकाल लागणार आहे माडखोल जिल्हा परिषद मधील दोन्ही पंचायत समिती हे एकाच वेळी निकाल जाहीर होणार आहेत तर त्यानंतर आंबोली कोलगाव माझगाव तळवडे इन्सुली.मळेवाड.आरोंदा.बांदा असे जिल्हा परिषद न्याय एकूण नऊ जिल्हा परिषद व 18 पंचायत समितीचे निकाल लावण्यात येणार आहेत.एकूण नऊ फेऱ्या होणार आहेत त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये माडखोल जिल्हा परिषद मध्ये सहा टेबल्स एका वेळी लावण्यात येणार आहेत.

Advertisement

सकाळी दहा वाजता पहिली टपाली मतदान हाती घेतल्यानंतर साडेदहा वाजता टपाली मतदान पूर्ण होणार आहे त्यानंतर दहा तीस वाजता माडखोल जिल्हा परिषद च्या दोन्ही पंचायत समिती मतदार संघाची सहा टेबल्स केंद्रनिहाय लावण्यात येणार आहेत ती अवघ्या पंधरा मिनिटात म्हणजे 11 वाजण्याच्या अगोदर या मतदारसंघाचा निकाल पूर्ण होणार आहे अशी प्रत्येक जिल्हा परिषद निहाय निकाल दिले जाणार आहेत संपूर्ण तालुक्याचा निकाल अडीच ते तीन वाजेपर्यंत अंतिम होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी समीर घारे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले..

सावंतवाडी तालुक्यातील सर्वात लक्षवेधी जिल्हा परिषद मतदार संघ कोलगाव व तळवडे या मतदारसंघाचा निकाल 11:30 वाजता लागणार आहे मतमोजणी ही जिल्हापरिषद व पंचायत समिती निहाय सुरू होणार आहे.
१८ गण ची १८ फेऱ्या होणार आहेत.प्रत्येक फेरीत त्या गणात जेवढी मतदान केंद्रे असतील तेवढी टेबल लावली जाणार.म्हणजे एका एका गणाची मोजणी पूर्ण केली जाणार..त्या नंतर दुसऱ्या फेरीत ३९ माडखोल व ७८ कलंबिस्त मधील या ८ केंद्राची ८ टेबल वर मोजणी पूर्ण होणार…अशा प्रकारे २ फेऱ्यात तो जिल्हा परिषद गट पूर्ण होणार…

Advertisement
Tags :

.