For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 29 केंद्रांवर मतमोजणी

06:17 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 29 केंद्रांवर मतमोजणी
Advertisement

तुमकूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दोन ठिकाणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटकातील 28 लोकसभा मतदारसंघांसाठी आज होणाऱ्या मतमोजणीसाठी 29 मतमोजणी केंद्रांवर 13,000 हून अधिक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कोणत्याही मतमोजणी केंद्राजवळ अनुचित घटना घडू नयेत, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Advertisement

राज्यात एकूण 28 लोकसभा मतदारसंघ आहेत. दक्षिण कर्नाटक आणि कारवार वगळता किनारपट्टी जिह्यांतील 14 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात उत्तर कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये  7 मे रोजी मतदान झाले होते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र तुमकूरमध्ये दोन ठिकाणी मतमोजणी होणार असून एकूण मतमोजणी केंद्रांची संख्या 29 आहे.

याविषयी बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी, कर्नाटकातील 28 लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजता सुरु होईल. मतमोजणी पर्यवेक्षकांसह 13,173 मतमोजणी कर्मचारी, मोजणी साहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत, असे सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी सर्व आवश्यक प्रशिक्षण आधीच पूर्ण झाले आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम आणि पोस्टल मतपत्रिकांची स्वतंत्र खोलीत मोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक सुविधा (संगणक, झेरॉक्स, फॅक्स, प्रिंटरसह) असलेली मीडिया केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे पत्रकारांना वार्तांकन करण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

बेंगळूरमध्ये 2,400 पोलीस तैनात

बेंगळूरमध्ये 2,400 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बेंगळूर शहर जिल्ह्यात बेंगळूर सेंट्रल मतदारसंघातील मतमोजणी वसंतनगर, बेंगळूर उत्तर मतदारसंघात सेंट जोसेफ हायस्कूल आणि बेंगळूर दक्षिणमध्ये जयनगर येथील एसएसएमआरव्ही कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी दिली.

Advertisement
Tags :

.