Sangli News : सांगलीत बँकेत बनावट नोटा जमा; खातेदारावर गुन्हा दाखल
01:41 PM Dec 05, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
सांगलीत बनावट नोटांचा शोध
Advertisement
सांगली : शहरातील एका बँकेत खातेदाराने पाचशे रुपयांच्या एकोणीस बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राशद जावेद मुल्ला (वय ४९, रा. ४८० अभिनव शाळेनजीक, शंभर फुटी रस्ता, शामरावनगर, सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सांगली अर्बन बँकेच्या टिंबर एरिया शाखेतील रोखपाल (कॅशिअर) विश्वास आत्माराम पाटील (रा. हरुगडे प्लॉट, सोसायटी रस्ता, सांगलीवाडी)यांनी फिर्याद दिली आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बँकेच्या टिंबर एरिया शाखेत खशतेदार राशद मुल्ला यांनी पाचशे रुपयांच्या एकोणीस नोटांचा भरणा केला होता. मात्र सदर नोटा बनावट असल्याचे तपासणीत बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
Advertisement
Advertisement