कराडला एस.टी.प्रशासनाची उलटी गिणती
2015 च्या तुलनेत 35 बस कमी, प्रवाशी वाढले बसेसची संख्या घटली
सतीश चव्हाण/ कराड
2015 साली 115 एस.टी.बस असणाऱया कराड आगाराकडे सध्या केवळ 80 बस उपलब्द आहेत. त्यातही बहुतांष बस वारंवार बंद पडत असल्याने कराड आगारावर लांब पल्यासाह ग्रामिण भागातील अनेक फेऱया रद्द करण्याची वेळ आली आहे. एकीकडी प्रवाशांची संख्या वाढलेली असताना बसेसची संख्या घटत असल्याने प्रवाशांसह विद्यार्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुरेशा प्रमाणात बस उपलब्द नसल्याने दररोज अनेक डयूटी रद्य होत असल्याने कर्मचाऱयांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे एस.टी.प्रशासनाने कराड आगाराला तातडीने नविन बसेस उपलब्द करून देण्याची मागणी प्रवाशांतुन होत आहे.
कोल्हापुर-पुणे महामार्गावरील महात्वाचे बसस्थानक म्हणुन ओळख असलेले कराड हे कोकण व घाटमाथ्याला जोडणारे प्रमुख बसस्थानक आहे. दररोज हजारो विद्यार्थी व प्रवाशी कराड बसस्थानाकातुन प्रवास करतात. याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोठयावधी रूपयांचा निधी खर्चुन कराडला सर्व सोयीसुविधानियुक्त नविन चकाचक बसस्थानकाची ईमारत बांधली आहे. मात्र कराड आगाराकडे पुरेशा प्रमाणात बस उपलब्द नसल्याने प्रवाशी वाहतुकीच्या मुख्य उद्येशाला हरताळ फासण्याचे काम एस.टी.प्रशासनाकडुन सुरू आहे.
2015 साली कराड आगाराकडे एकुण 115 एस.टी.बस होत्या. सध्या मात्र जेमतेम 80 बस शिल्लक आहेत. वास्तवीक 7 ते 8 वर्षाच्या काळात प्रवाशांची संख्या वाढलेली असताना एस.टी.बसेस ची संख्या घटल्याने चिंता व्यक्त होत आहे. बस उपलब्द होत नसल्याने लांब पल्यासह ग्रामिण भागातील अनेक फेऱया रद्द करण्याची नामुष्की कराड आगारावर आली आहे. कराड आगाराच्या माध्यमातुन पुर्वी मुंबईला दररोज 8 फेऱया होत होत्या सध्या केवळ 2 फेऱया सुरू आहेत. तर पुणेच्या 12 फेऱयावरून 6 फेऱया करण्यात आल्या आहेत. शिर्डी, औरंगाबाद, विजापुर अशा अनेक लांब पल्याच्या फेऱया बंद करण्यात आल्या आहेत. कराड तालुक्यात जवळपास 200 गावं आहेत. त्यामुळे लांब पल्याच्या फेऱया सांभाळुन तालुक्यातील गावांना फेऱया कराव्या लागत आहेत.
दररोज 15 हजार विद्यार्थी करतात प्रवास
विद्येचे माहेरघर म्हणुन कराडची ओळख आहे. शहरासह विद्यानगर येथे असलेल्या विविध शैक्षणीक संकुलामुळे दररोज हजारो विद्यार्थी कराडला येतात. कराड आगारातुन दर महिन्याला 15 हजार विद्यार्थी मासिक पास काढतात. मात्र ग्रामिण भागासह विद्यागरला जाणाऱया बसेसची अत्यंत तोकडी संख्या असल्याने विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कराड बसस्थानत ते विद्यानगर या तिन किमीच्या आंतरासाठी रिक्षाला 20 रूपये द्यावे लागतात. तर बस मिळत नाही त्यामुळे ग्रामिण भागातील शेकडो विद्यार्थी पायपीट करीत महाविद्यालयात ये-जा करतात,
उत्पन्नात राज्यात दुसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
अत्यंत कमी बस व लांब पल्याच्या अनेक फेऱया बंद असतानाही कराड आगार उत्पन्नात आव्वल आहे. सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे व सोलापुर या पाच जिल्हयात उत्पन्नाच्या बाबतीत कराड आगाराचा व्दितीय तर सातारा जिल्हयात प्रथम क्रमांक आला आहे. सध्या कराड आगाराचे दररोज सरासरी 10 लाख रूपयांचे उत्पन्न आहे. फेऱयांची संख्या पहाता कराडला आजुन 70 बसेसची गरज आहे. एस.प्रशासनाने नविन बस दिल्या तर कराड आगाराचे उत्पन्न दुपटीने वाढणार आहे.
एस.टी.प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई लढणार कराड शहरातुन पुणे-मुंबईसह ग्रामिण भागात खाजगी प्रवाशी वाहतुक फोफावली आहे.एस.टी.प्रशासन जाणुन बुजुन खाजगी प्रवाशी वाहतुकीला प्रत्साहन देतय का असा सवाल उपस्थीत होत आहे. याकडे सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. एस.टी.प्रशासनाने जर कराड आगाराला तातडीने आवश्यक बस उपलब्द करूण दिल्या नाहीत तर एस.टी.प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्यात येईल