लोकमान्यतर्फे किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम
शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे आयोजन
कुडाळ / वार्ताहर
कुडाळ तालुक्यातील शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे गुरुवार २६ जून रोजी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते दहावीतील किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माणगाव येथील धन्वंतरी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी समुपदेशन केले . यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगूत, सहाय्यक शिक्षिका स्वरा राऊळ, प्रा .सुभाष विणकर , लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी सावंतवाडी शाखेच्या सीएसआर प्रतिनिधी गौरी जुवेकर, लोकमान्य कुडाळ शाखेच्या सीनियर अकाउंट असिस्टंट स्मिता ठाकूर, भानुदास वालावलकर, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरा राऊळ यांनी करून शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीने आभार मानले.