महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बीआरपी-सीआरपी पदासाठी कौन्सिलिंग

11:22 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इतर माध्यमातील उमेदवार दिल्याने उडाला गोंधळ 

Advertisement

बेळगाव : शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवारी ब्लॉक रिसोर्स पर्सन (बीआरपी) व क्लस्टर रिसोर्स पर्सन (सीआरपी) पदासाठी कौन्सिलिंग प्रक्रिया राबविण्यात आली.क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कौन्सिलिंगची प्रक्रिया पार पाडली. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.शहरासह जिल्ह्यातील विविध पदांसाठी मंगळवारी कौन्सिलिंग झाले. शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौन्सिलिंगची संधी देण्यात आली.

Advertisement

प्राथमिक विभागात बीआरपी पदासाठी 19 तर सीआरपी पदासाठी 24 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. हायस्कूल विभागातून बीआरपी पदासाठी 19 तर सीआरपी पदासाठी 2 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. तर शिक्षक संयोजक पदाची 16 जणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळपासून कौन्सिलिंगला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक याठिकाणी उपस्थित होते. सुरुवातीला ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. परंतु दुपारनंतर नव्या नियमावलीमुळे काहीसा गोंधळ झाला होता. मराठी माध्यमासाठी असलेल्या पदांवर त्याच माध्यमातील उमेदवाराची निवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु काही ठिकाणी यापूर्वी इतर माध्यमातील उमेदवार देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article