For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरजिल्हा बदलीसाठी कौन्सिलिंग सुरू

11:39 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरजिल्हा बदलीसाठी कौन्सिलिंग सुरू
Advertisement

12 ऑगस्टपर्यंत चालणार प्रक्रिया : अन्य जिल्ह्यांमध्ये सेवा करण्याची शिक्षकांना संधी देणार

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यांतर्गत शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आंतरजिल्हा बदलीसाठी कौन्सिलिंग सुरू झाले आहे. क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळपासून आंतरजिल्हा कौन्सिलिंग सुरू झाले. थेट बेंगळूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कौन्सिलिंग प्रक्रिया राबविण्यात येत होती. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे कौन्सिलिंग घेण्यात आले. मागील आठवड्यात जिल्ह्यांतर्गत कौन्सिलिंग महिला विद्यालय येथे पार पडले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील कलाशिक्षक, शारीरिक शिक्षक, मुख्याध्यापक व सहशिक्षक या पदासाठीचे कौन्सिलिंग टप्प्याटप्प्याने करण्यात आले. त्यानंतर आता आंतरजिल्हा कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत जागा उपलब्ध झाली नाही, त्यांना आता आंतरजिल्हा कौन्सिलिंगद्वारे इतर जिल्ह्यांमध्ये सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे.

शुक्रवारी पहिल्या टप्प्यात प्राथमिक विभागाचे कौन्सिलिंग झाले. यामध्ये विषय शिक्षक, क्रीडाशिक्षक, मुख्याध्यापक व सहशिक्षक या पदासाठी कौन्सिलिंग प्रक्रिया राबविण्यात आली. 20 शिक्षकांचे सकाळच्या सत्रात कौन्सिलिंग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील शिक्षक या कौन्सिलिंगवेळी उपस्थित होते. इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही बेळगाव जिल्ह्यात सेवा मिळणार शुक्रवार दि. 2 रोजी कौन्सिलिंग सुरू झाले असून, ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान प्राथमिक, 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान माध्यमिक शिक्षकांचे कौन्सिलिंग होणार आहे. 12 रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांची परस्पर सहमतीची बदली केली जाणार आहे. यामुळे इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही बेळगाव जिल्ह्यात सेवा देता येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.