For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान हैदराबादला देऊ शकेल दणका ?

06:55 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान हैदराबादला देऊ शकेल दणका
Advertisement

आज ‘एलिमिनेटर’ सामना, दोन स्फोटक आघाडी फळींमध्ये रंगेल मुकाबला

Advertisement

हैदराबाद/ वृत्तसंस्था 

मुल्लानपूर : आज बुधवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात पुनरागमनाच्या जोरावर उत्साह वाढून सज्ज झालेला राजस्थान रॉयल्स आणि भक्कम स्थितीत असलेला सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येतील. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आक्रमकपणा आणि निर्भीडपणा सनरायझर्सच्या स्फोटक वरच्या फळीतील फलंदाजांच्या एकत्रित ताकदीशी भिडणार आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेची सुऊवात संथ गतीने केली होती. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना सातत्यपूर्ण गती गवसली. लीग फेरीतील शेवटच्या सात सामन्यांसाठी नियमित कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन झाल्याचाही संघावर मोठा सकारात्मक परिणाम झाला, कारण या सातपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. लीग टप्प्यात राजस्थान रॉयल्सचा दोनदा पराभव केल्यामुळे कमिन्स आणि त्याच्या संघाकडे या अत्यंत तणावपूर्ण अशा ‘नॉकआऊट’ सामन्यात उतरताना एक मानसिक आघाडी असेल.

खुद्द रॉयल्सच्याच म्हणण्यानुसार, लीग टप्प्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता ते त्यापूर्वीच स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरायला हवे होते. मात्र आता ते या टप्प्यावर पोहोचले असल्यामुळे रियान परागच्या नेतृत्वाखालील हा संघ सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून स्पर्धेत आणखी पुढे जाण्यासाठी अत्यंत आतुर झालेला असेल. रॉयल्सच्या वरच्या फळीत समावेश असलेल्या आणि सनसनाटी कामगिरी करणाऱ्या सूर्यवंशी (583 धावा), यशस्वी जैस्वाल (397) आणि ध्रुव जुरेल (458) या त्रिकुटाने अपेक्षेप्रमाणे संघासाठी धावांचा मोठा वाटा उचलला आहे.

सनरायझर्सच्या अभिषेक शर्मा (563 धावा), ट्रॅव्हिस हेड (393) आणि ईशान किशन (569) या त्रिकुटाच्या बाबतीतही परिस्थिती अशीच आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हेन्रिक क्लासेनचा (606 धावा) विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. कारण तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आयपीएल हंगामातून जात आहे. दोन्ही संघांच्या वरच्या फळीत असलेल्या विध्वंसक फलंदाजीच्या क्षमतेचा विचार करता जैस्वाल आणि हेड यांना अपेक्षित तितकी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. हा ‘एलिमिनेटर’ सामना त्यांना आपापल्या संघासाठी सामन्याचे चित्र बदलून टाकणारी कामगिरी करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देतो.

सनरायझर्स हा कदाचित या स्पर्धेतील सर्वांत विध्वंसक संघ आहे. रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा बुधवारी रात्री संघ खेळताना पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज जोफ्रा आर्चरवर (21 बळी) अवलंबून असतील. त्याने वानखेडेवर मुंबई इंडियन्सविऊद्धच्या जिंकणे आवश्यक असलेल्या सामन्यात पारंपरिक आणि क्रॉस सीम या दोन्ही प्रकारच्या गोलंदाजीने मुंबईला दणके दिले. नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा यांनीही खेळाच्या सर्व टप्प्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. तऊण लेगस्पिनर यश राज पुंजा आपल्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात रवी बिश्नोईच्या पुढे प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून उदयास आला आहे, तर अनुभवी रवींद्र जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

डावाच्या सुऊवातीला सूर्यवंशी कमिन्स, सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ईशान मलिंगा (19) आणि साकिब हुसेन यांच्यासारख्या गोलंदाजांना अजिबात मान देणार नाही हे उघड आहे. जर या किशोरवयीन खेळाडूने पॉवरप्लेमध्ये चांगली सुऊवात केली, तर तो सहज प्रतिस्पर्धी संघाकडून सामना हिसकावून घेऊ शकतो. आपल्या पदार्पणाच्या हंगामातील आणखी एक मनगटी फिरकी गोलंदाज शिवांग कुमार यानेही सनरायझर्ससाठी मधल्या षटकांमध्ये आपली छाप पाडली आहे.

संघ-राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रे•ाr, लियाम लिव्हिंगस्टोन, इशान मलिंगा, साकिब हुसेन, शिवांग कुमार, झीशान अन्सारी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.