मोबाईल फोन स्वस्त होऊ शकतात?
सरकारकडून कर कपात केल्यास दिलासा मिळण्याचे संकेत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मोबाईलची मागणी कमी झाल्यामुळे, सरकार फोनवर आकारला जाणारा 18 टक्के जीएसटी कमी करू शकते, असे म्हटले जात आहे. असे झाल्यास भविष्यात तुमच्यासाठी स्मार्टफोन खरेदी करणे स्वस्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महागड्या फोनची मागणी कमी झाल्यामुळे सरकार त्यांच्या विक्रीवर आकारला जाणारा 18 टक्के जीएसटी दर कमी करू शकते. जर नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही थोडा वेळ थांबायला हरकत नाही. कारण नजीकच्या भविष्यात मोबाईल फोन स्वस्त होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत.
मागणी कमी झाल्यामुळे सरकार महागड्या फोनच्या विक्रीवर आकारला जाणारा 18 टक्के जीएसटी दर कमी करू शकते, असे म्हटले जात आहे. जेणेकरून फोनची मागणी पुन्हा वाढू शकेल. असेही म्हटले जात आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना एक मोठी बातमी देऊ शकतात.
आजकाल स्मार्टफोनच्या वाढत्या किमतींमुळे लोक त्यांचे जुने फोन जास्त काळ वापरत आहेत. त्यामुळे मोबाईलची बाजारात मागणी कमी झाली आहे. 18 टक्के जीएसटी हे देखील फोन महाग होण्याचे एक कारण आहे. त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी सरकार जीएसटी कर कमी करू शकते. कर कपातीचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल, ज्यामुळे मोबाईल फोनची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मोबाईल फोनवरील जीएसटीमध्ये किती कपात?
2020 पर्यंत मोबाईल फोनवर 12टक्के कर आकारला जात होता. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन सरकारकडे जुना दर लागू करण्याची मागणी करत आहे. म्हणजेच, ही मागणी मान्य झाल्यास, मोबाईल फोनवर आकारला जाणारा जीएसटी 12 टक्के वरून 5टक्केपर्यंत येऊ शकतो. जर 18 टक्के जीएसटी 12 टक्के झाला, तर स्मार्टफोनच्या किमतीत घट झालेली दिसेल.
मोबाईल फोन स्वस्त का होतील?
मोबाईल फोन स्वस्त झाल्यास त्याचा फायदा मध्यमवर्गीय कुटुंबे, विद्यार्थी इत्यादींना होईल. पण याचा सकारात्मक परिणाम मोबाईल फोनच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून येऊ शकतो. कारण स्वस्त फोन म्हणजे विक्रीत वाढ आणि विक्रीत वाढ म्हणजे कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ, हे शक्य असते.