स्कॉटलंडचा 36 वर्षांनंतर विश्वचषकात पहिला विजय
हैतीवर एका गोलने विजय, जॉन मॅकगिनचा एकमेव गोल
वृत्तसंस्था,/ फॉक्सबरोग
‘टॉर्टन आर्मी’च्या (प्रवासी चाहते) जोरदार पाठिंब्याच्या जोरावर स्कॉटलंडने 36 वर्षांनंतर पहिला विश्वचषक विजय साजरा करताना हैतीचा 1-0 असा पराभव केला. जॉन मॅकगिनने पूर्वार्धात हा गोल नोंदवला.
ब्राझील व मोरोक्कोसारख्या बलाढ्या संघांशी मुकाबला करण्यापूर्वी तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या हैती संघाविरुद्ध तीन गुण मिळविणे स्कॉटलंडसाठी आवश्यक होते. त्यांनी या सामन्यात 28 व्या मिनिटाला आघाडी घेतली. चे अॅडम्सने जवळून मारलेला फटका गोलरक्षक जॉनी प्लासिडने अडवला. परंतु चेंडू मॅकगिनकडे परत आला. त्यावर मॅकगिनने मारलेला जोरदार फटका हैतीच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून जाऊन थेट जाळीत विसावला. त्याआधी अकरा मिनिटापूर्वी स्कॉट मॅकटोमिनीचा फटका गोलपोस्टला आदळला होता.
सामन्याच्या उत्तरार्धात हैतीने आपला वेगवान खेळाची झलक दाखवत स्कॉटलंडवर दबाव निर्माण केला असला तरी स्कॉटिश गोलरक्षक अंगस गनला फारसे बचाव करावे लागले नाहीत. या विजयामुळे स्कॉटलंडने गट सी मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ब्राझील व मोरोक्को यांना मागे टाकले आहे.
मंगळवारचे सामने
1) बेल्जिय वि. इजिप्त
वेळ : सोमवारी मध्यरात्री 12.30 पासून
2) सौदी अरेबिया वि. उरुग्वे
वेळ : सोमवारी उत्तररात्री 3.30 पासून
3) इराण वि. न्यूझीलंड
वेळ : सकाळी 6.30 पासून
रविवारचे निकाल
1) ऑस्टेलिया विजयी वि. तुर्की 2-0
2) ब्राझील बरोबरी वि. मोरोक्को 1-1
3) कतार बरोबरी वि. स्वित्झर्लंड 1-1
4) स्कॉटलंड विजयी वि. हैती 1-0.