आंबोली घाट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार
अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; बबन साळगावकरांची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
चार वर्षात चार कोटी रुपये आंबोली घाट रस्त्यावर खर्च झाला आहे. मात्र प्रत्यक्षात 16 रुपये खर्च झाला नाही. रस्ता जैसे थे आहे. हा पैसा कुणाच्या घशात गेला असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला. 16कोटी 65 लाख रुपये आंबोली घाट रस्त्यावरती गेल्या चार वर्षांमध्ये खर्च केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आंबोली घाटावरती 16 रुपयाचेही काम झाल्याचे दिसत नसून या कामात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तसेच पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी अर्ज दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी बबन साळगावकर यांनी केली आहे. आठ दिवसांमध्ये पोलिसांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाचे लेखी उत्तर आम्हाला मिळालं नसून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ती गुन्हे दाखल करण्याच्या बाबत आम्ही ठाम आहोत. पोलिसांच्या लेखी उत्तराची वाट पाहत असून मागील दहा वर्षाचा खर्च सन 2013 ते सन 2023 पर्यंत खर्च माहितीच्या अधिकाऱ्यात घेत असून पोलिसांच्या लेखी उत्तरानंतर न्यायालयामध्ये या संदर्भात अर्ज दाखल करून महाराष्ट्र शासनाने याची गंभीर नोंद घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे .